Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी सिनेमाचा उदो उदो! 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘या’ अभिनेत्याला पुरस्कार जाहीर

72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून 'मुक्काम पोस्ट बॉम्बीलवाडी'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी चित्रपट 'हमसफर'ला सर्वोत्कृष्ट लघुपट, तर 'भंगार'ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटाचा सन्मान मिळाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 06:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
  • मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
  • उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीचा गौरव करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैविध्यपूर्ण परंपरेला सलाम केला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या विविध भारतीय भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा यंदा गौरव करण्यात आला. दिग्दर्शक जयराज यांच्या अध्यक्षतेखालील 11 सदस्यीय परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड केली असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Subodh Bhave : ‘तुला अक्कल आहे का?’ श्रेयस तळपदेनं मध्यरात्री सुबोध भावेला घरी बोलावून चांगलंच सुनावलं, नेमकं काय झालं

मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार विशेष ठरले. ‘मुक्काम पोस्ट बॉम्बीलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा, तर ‘भंगार’ या मराठी-इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.

हिंदी विभागात ‘श्रीकांत’ या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला. अभिनेत्री यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर दिग्दर्शक आनंद एल. राय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले. प्रादेशिक चित्रपटांच्या विभागातही विविध भाषांतील चित्रपटांनी आपली छाप पाडली. तेलुगूतील ‘कमेटी कुल्लू’, तमिळमधील ‘रायन’, मल्याळममधील ‘फेमिनिची फातिमा’, कन्नडमधील ‘मिथिया’, ओडिया भाषेतील ‘लहरी’ तसेच हिंदीतील ‘श्रीकांत’ या चित्रपटांनी संबंधित विभागात पुरस्कार पटकावले.

‘शिवाजी जन्माला यावा पण…’ शिव ठाकरेने चाहत्यांना दिला संदेश! Sonam Wangchuk यांच्यासाठी केली विशेष पोस्ट

तांत्रिक विभागातही अनेक चित्रपटांचा गौरव झाला. ‘स्त्री 2’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. ‘पुष्पा 2’ला वेशभूषा, ‘कल्कि 2898 AD’ला प्रॉडक्शन डिझाइन, तर ‘भूल भुलैया 3’ला सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. याशिवाय विविध तांत्रिक आणि सर्जनशील विभागांतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनाही राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला होता. विविध भारतीय भाषांमधील चित्रपटांचे परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी दर्जेदार चित्रपट, प्रभावी अभिनय आणि उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीचा गौरव करत भारतीय चित्रपटसृष्टीच्या वैविध्यपूर्ण परंपरेला सलाम केला.

Web Title: Announcement of the 72nd national film awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • hit movies
  • National Film Award

संबंधित बातम्या

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता
1

The India Story Trailer : ‘द इंडिया स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित! कीटकनाशक शेतीमागील काळं सत्य; काजल अग्रवालसोबत मराठमोळा अभिनेता

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग
2

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला
3

‘सौभाग्यवती सरपंच २’चा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; ‘या’ तारखेपासून Ultra Jhakaas Marathi OTT वर प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.