फोटो सौजन्य - Social Media
Jennifer Winget दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण
शिव ठाकरे पोस्ट करत म्हणाला आहे की, “‘माझ्या घरात काही झालं नाही आहे किंवा सदर मुद्दा माझ्या घराविषयीचा नाही आहे, तर मी का पुढाकार घेऊ? जेव्हा विषय माझ्या घरापर्यंत पोहचेल तर मी हालचाल करेल.’ जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. जेव्हा कुणी आपल्या देशासाठी आवाज उचलत आहे, चुकीच्या गोष्टींसाठी लढत आहे तर आपण त्यांच्यामागे खंबीर असलो पाहिजे.” पुढे अभिनेता सांगतो की “आमच्या मराठीत एक म्हण आहे ‘शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात‘. हा मुद्दा कोणत्या पक्षविरोधात नाहीये. हा विरोध चुकीच्या गोष्टींसाठी आहे. मग सत्तेत कोणताही पक्ष का असेना, आपण गोष्टींविरोधात उभे राहिलेच पाहिजे.
अभिनेता म्हणतो की “जर आपण पुढाकार घेऊ शकत नाही तर जो घेतोय किमान त्याच्यामागे तरी उभे राहा.” एकंदरीत, शिव त्याच्या चाहत्यांना सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी सांगत आहे. हा मुद्दा कोणत्या पक्षविरोधात नसून शिक्षणासाठी उचलला गेलेला मुद्दा आहे त्यामुळे आपण त्यासाठी एकत्र आले पाहिजेत असा संदेश त्याने या पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.
Salman Khan : सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्या, झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात नवी सुरुवात
अनेक मराठी कलाकारांनी दिला पाठिंबा!
मराठी सिनेसृष्टीतून याआधी अनेक मराठी कलाकारंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवला होता. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एका दिवसासाठी उपोषण करत सोनम यांना पाठिंबा दर्शवला तर सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवेने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘लोकशाहीचा मृत्यू! आणि धर्मेंद्र प्रधान हे असक्षम शिक्षण मंत्री आहेत‘ असे नमूद केले आहे.






