Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: मलेशियाच्या PM अन्वर इब्राहिम यांनी गायले किशोर कुमारांचं गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Anwar Ibrahim Kishore Kumar Song: BRICS परिषदेदरम्यान मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी किशोर कुमारांचे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ गाणे गायले. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 13, 2026 | 11:30 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • मलेशियाच्या पंतप्रधानांना किशोर कुमार यांची भुरळ
  • BRICS परिषदेतला व्हिडीओ तुफान व्हायरल
  • किशोर कुमारांचं गाणं ऐकून नेटकरी खूश
Anwar Ibrahim Kishore Kumar Song:BRICS परिषदेच्या निमित्ताने मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले आहेत. राजनैतिक बैठका आणि विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चांमध्ये व्यस्त असतानाच त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात अन्वर इब्राहिम यांनी ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांचं अजरामर गाणं गाऊन उपस्थितांना थक्क केलं. त्यांच्या या गायनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पियानोच्या साथीने गायले किशोर कुमारांचे गाणे

अन्वर इब्राहिम यांनी ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत’ हे लोकप्रिय गाणं पियानोच्या साथीने सादर केलं. हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीन देवियां’ या चित्रपटातील आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून, एस. डी. बर्मन यांनी त्याला संगीत दिलं आहे.

पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या गायनाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राजनैतिक कार्यक्रमात भारतीय सिनेसंगीताची झलक पाहायला मिळाल्याने हा क्षण विशेष ठरला. अन्वर इब्राहिम यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या सादरीकरणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबत त्यांनी मजेशीर कॅप्शन लिहित गाण्याची परवानगी मागितल्याचंही पाहायला मिळत आहे.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अन्वर इब्राहिम यांच्या गायनाचं कौतुक केलं आहे. “ते खूप छान गायले,” अशा प्रतिक्रिया अनेक युजर्सनी दिल्या. तर काहींनी अन्वर इब्राहिम इतकं सुंदर गाऊ शकतात, याची कल्पनाच नव्हती, असंही म्हटलं आहे.

भारतीय संगीताबद्दल अन्वर इब्राहिम यांनी प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसंगी भारतीय चित्रपट आणि गाण्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मागील भारत दौऱ्यात एका माध्यम संवादादरम्यान त्यांनी किशोर कुमार यांचं हेच गाणं गायल्याचंही सांगितलं जातं. याशिवाय दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी मुकेश यांचं ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे प्रसिद्ध गाणंदेखील सादर केलं होतं.


Haiwaan OTT Release: थिएटरनंतर ‘हैवान’ची OTTवर एन्ट्री; कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहता येणार अक्षय-सैफचा चित्रपट?

BRICS परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

दरम्यान, अन्वर इब्राहिम यांच्या भारत दौऱ्यादरम्यान BRICSशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मलेशिया यावेळी BRICSमध्ये भागीदार देश म्हणून सहभागी झाला आहे. शिखर परिषदेत जागतिक घडामोडींसोबतच आर्थिक संबंध आणि व्यापारविषयक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

भारत आणि मलेशियामधील डिजिटल तंत्रज्ञान, पर्यटन यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक लोकप्रियतेचा उल्लेख करत अन्वर इब्राहिम यांनी त्यांच्या देशातील अनेक नागरिकांनी मोदींना शुभेच्छा देण्यास सांगितल्याचंही सांगितलं.

राजकीय आणि राजनैतिक चर्चांदरम्यान अन्वर इब्राहिम यांनी किशोर कुमारांचं गाणं सादर केल्याने भारत-मलेशिया संबंधांमध्ये सांस्कृतिक जवळीकही अधोरेखित झाली आहे.

Marathi Serial: ‘आता पुढचे १० दिवस…’, बाप्पाच्या आगमनाने सावली-तिलोत्तमाचं नातं बदलणार? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट

Web Title: Anwar ibrahim kishore kumar song brics summit viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Gaurav Khanna-Akanksha Chamola Divorce:  १० कोटींची पोटगी घेणार आकांक्षा चमोला?  अभिनेत्रीची प्रतिक्रिया व्हायरल
1

Gaurav Khanna-Akanksha Chamola Divorce: १० कोटींची पोटगी घेणार आकांक्षा चमोला? अभिनेत्रीची प्रतिक्रिया व्हायरल

Marathi Serial: ‘आता पुढचे १० दिवस…’, बाप्पाच्या आगमनाने सावली-तिलोत्तमाचं नातं बदलणार? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट
2

Marathi Serial: ‘आता पुढचे १० दिवस…’, बाप्पाच्या आगमनाने सावली-तिलोत्तमाचं नातं बदलणार? ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये मोठा ट्विस्ट

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर
3

Aishwarya Narkar: “तुम्ही स्वतःच 80s च्या आहात, ओरिजनल फोटो टाका…”; ऐश्वर्या नारकरांचं भन्नाट उत्तर

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार
4

Sayani Gupta: सयानी गुप्ताची आंतरराष्ट्रीय झेप; ‘आर्या’मध्ये ‘रिव्हरडेल’ फेम रॉस बटलरसह झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.