( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Haiwaan OTT Release: अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या ‘हैवान’ या क्राइम-थ्रिलर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले असून, अक्षय आणि सैफची जोडी तब्बल १८ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळाल्याने चाहत्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयापासून ते कथानकापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता ‘हैवान’च्या OTT प्रदर्शनाबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सिनेमागृहातील प्रदर्शनानंतर ‘हैवान’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार, याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स SonyLIV ने मिळवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे थिएटरनंतर प्रेक्षकांना ‘हैवान’ SonyLIV वर पाहता येणार आहे.
मात्र, चित्रपटाच्या OTT रिलीजची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर साधारण आठ आठवड्यांनी OTTवर चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असते. त्यामुळे ‘हैवान’देखील थिएटर रननंतर जवळपास आठ आठवड्यांनी SonyLIV वर स्ट्रीम होऊ शकतो.
‘हैवान’च्या निमित्ताने अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. यापूर्वी दोघे २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तशान’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
‘हैवान’मध्ये अक्षय कुमारने नकारात्मक भूमिका साकारली आहे, तर सैफ अली खान एका नेत्रहीन व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहे. दोन्ही कलाकारांच्या अभिनयाची सोशल मीडियावर चर्चा होत असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘हैवान’मध्ये बोमन इराणी, श्रिया पिळगावकर, सैयामी खेर, राजपाल यादव, असरानी आणि शारिब हाशमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
आता ‘हैवान’चा थिएटरमधील प्रवास कसा राहतो आणि त्यानंतर SonyLIV वर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






