Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arjun Bijlani: अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीच्या टी-शर्टवरून का झाला वाद? माफी मागत दिलं स्पष्टीकरण

Arjun Bijlani Wife Controversy:अर्जुन बिजलानीची पत्नी नेहा स्वामीच्या टी-शर्टवरील उर्दू शब्दांमुळे वाद निर्माण झाला. ट्रोलिंगनंतर अर्जुन आणि नेहाने स्पष्टीकरण देत माफी मागितली

  • By अमृता यादव
Updated On: Oct 15, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Arjun Bijlani:  टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि त्याची पत्नी नेहा स्वामी सध्या एका टी-शर्टमुळे चर्चेत आले आहेत. नेहाने परिधान केलेल्या टी-शर्टवरील उर्दू शब्दांमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. या टी-शर्टवर एका कार्टून पात्रासोबत उर्दूमध्ये ‘अल्लाह’ हा शब्द लिहिलेला असल्याचे दिसले. यामुळे नेहा स्वामीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. वाढत्या टीकेनंतर अर्जुन आणि नेहा यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.

नेहा स्वामीच्या टी-शर्टवरून नेमका वाद काय?

अलीकडेच अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी त्यांचा मुलगा अयानसोबत दिसले होते. यावेळी नेहाने टी-शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. तिच्या टी-शर्टवरील कार्टून पात्र आणि उर्दूतील मजकूर सोशल मीडियावरील चर्चेचा विषय ठरला. या मजकुरातील धार्मिक संदर्भामुळे काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर नेहाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

चाहत्याने भेट दिला होता टी-शर्ट

या वादावर स्पष्टीकरण देताना अर्जुन बिजलानीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सांगितले की, बँकॉकच्या सहलीदरम्यान एका चाहत्याने त्यांना हा टी-शर्ट भेट दिला होता. त्यावरील मजकूर उर्दूमध्ये असल्यामुळे त्याचा अर्थ समजला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टी-शर्ट घालताना त्यावरील शब्दांचे धार्मिक महत्त्व माहीत नव्हते, अशी भूमिका या जोडप्याने मांडली.

‘धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’

अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून या प्रकरणी माफी मागितली. टी-शर्टवरील शब्दांचा अर्थ किंवा महत्त्व नेहाला माहीत नव्हते आणि कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

या निवेदनात त्यांनी सर्व धर्मांचा आणि पंथांचा आदर करत असल्याचे सांगितले. कोणाच्याही भावना दुखावतील असे कृत्य जाणूनबुजून करणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नेहाविरोधातील ट्रोलिंग आणि धमक्यांवरही व्यक्त केली नाराजी

टी-शर्टबाबत स्पष्टीकरण देतानाच या जोडप्याने नेहा स्वामीविरोधात करण्यात येणाऱ्या अपमानास्पद टिप्पण्या, शिवीगाळ आणि धमक्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. धार्मिक विषयांबाबत लोकांच्या भावना तीव्र असू शकतात, हे मान्य करतानाच माहितीचा अभाव हा कोणालाही ऑनलाइन त्रास देण्याचा किंवा धमकावण्याचा आधार ठरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Dutt: ‘आम्हाला छोटा सलमान हवा आहे..’, संजय दत्तने भाईजानकडे व्यक्त केली खास इच्छा, सलमान खानचं उत्तर चर्चेत!

प्रकरण सामंजस्याने हाताळण्याचे आवाहन

अर्जुन आणि नेहा यांनी सर्वांना हे प्रकरण संवेदनशीलतेने, सहानुभूतीने आणि परस्पर आदराने हाताळण्याचे आवाहन केले. द्वेष पसरवणे किंवा नेहा आणि तिच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याऐवजी संवादातून परिस्थिती सोडवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या स्पष्टीकरणानंतर टी-शर्टवरून सुरू झालेल्या वादात नेहा स्वामी आणि अर्जुन बिजलानी यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. धार्मिक भावना आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंग या दोन्ही मुद्द्यांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.

Honey Singh: हनी सिंगला महाराष्ट्र सायबरचा समन्स; चौकशीसाठी दोन दिवसांची मुदत, हजर न राहिल्यास कारवाई

Web Title: Arjun bijlani wife neha swami tshirt controversy apology ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

Imran Khan: आमिर खानचा भाचा इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
1

Imran Khan: आमिर खानचा भाचा इमरान खानला भारत सोडण्याची नोटीस; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!

Sanjay Dutt: ‘आम्हाला छोटा सलमान हवा आहे..’, संजय दत्तने भाईजानकडे व्यक्त केली खास इच्छा, सलमान खानचं उत्तर चर्चेत!
2

Sanjay Dutt: ‘आम्हाला छोटा सलमान हवा आहे..’, संजय दत्तने भाईजानकडे व्यक्त केली खास इच्छा, सलमान खानचं उत्तर चर्चेत!

Honey Singh: हनी सिंगला महाराष्ट्र सायबरचा समन्स; चौकशीसाठी दोन दिवसांची मुदत, हजर न राहिल्यास कारवाई
3

Honey Singh: हनी सिंगला महाराष्ट्र सायबरचा समन्स; चौकशीसाठी दोन दिवसांची मुदत, हजर न राहिल्यास कारवाई

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.