Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baahubali: ‘बाहुबली’ युनिव्हर्सचा ग्लोबल विस्तार; ड्रीम थिएटरसोबत मोठी पार्टनरशिप

Baahubali: आर्का मीडिया वर्क्स आणि ड्रीम थिएटरची ‘बाहुबली’ फ्रँचायझीसाठी भागीदारी. भारतात लायसन्सिंग, मर्चेंडायझिंगसह आंतरराष्ट्रीय ब्रँड पार्टनरशिप्सवर भर.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 10, 2026 | 04:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Baahubali: ‘बाहुबली’ या लोकप्रिय फ्रँचायझीचा विस्तार आता आणखी मोठ्या स्तरावर होणार आहे. आर्का मीडिया वर्क्सने ड्रीम थिएटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत महत्त्वाची भागीदारी जाहीर केली आहे. ‘बाहुबली’ फ्रँचायझी आणि आगामी CGI अॅनिमेटेड चित्रपट ‘बाहुबली: द इटरनल वॉर – पार्ट 1’ आणि ‘पार्ट 2’ यांच्यासाठी कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि ब्रँड पार्टनरशिप्स कार्यक्रमाच्या दृष्टीने ही भागीदारी करण्यात आली आहे.

भारतासाठी ड्रीम थिएटर एक्सक्लुझिव्ह पार्टनर

या करारानुसार ड्रीम थिएटरला भारतासाठी एक्सक्लुझिव्ह लायसन्सिंग आणि मर्चेंडायझिंग पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय लायसन्सिंग, स्पॉन्सरशिप्स, ब्रँड असोसिएशन्स, प्रमोशनल टाय-अप्स आणि को-ब्रँडेड इनिशिएटिव्ह्जसाठी ड्रीम थिएटर स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून काम करणार आहे.

या भागीदारीमुळे ‘बाहुबली’ची लोकप्रिय फ्रँचायझी आणि एंटरटेनमेंट व लाइफस्टाइल क्षेत्रातील लायसन्सिंग आणि कन्झ्युमर प्रॉडक्ट्स तयार करण्याचा ड्रीम थिएटरचा अनुभव एकत्र येणार आहे.

‘बाहुबली’नंतर आता अॅनिमेशनच्या विश्वात प्रवेश

‘बाहुबली’च्या दोन्ही चित्रपटांनी मिळून जगभरात २,४०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे या फ्रँचायझीचा मोठा प्रेक्षकवर्ग भारतासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येही आहे. आता ‘बाहुबली: द इटरनल वॉर’च्या माध्यमातून ही फ्रँचायझी अॅनिमेशनच्या विश्वात विस्तारत आहे.

आर्का मीडिया वर्क्स निर्मित आणि ईशान शुक्ला दिग्दर्शित हा दोन भागांचा CGI अॅनिमेटेड एपिक आहे. ‘द इटरनल वॉर’मध्ये ‘बाहुबली’च्या मृत्यूनंतरची कथा दाखवली जाणार आहे. आफ्टरलाइफमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्यासमोर १४ रिअल्म्समध्ये पसरलेलं आव्हान उभं राहतं.

भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरणा घेत या चित्रपटात स्टायलाइज्ड CGI अॅनिमेशनच्या माध्यमातून एक वेगळं व्हिज्युअल विश्व तयार करण्यात आलं आहे.

अॅनेसी फिल्म फेस्टिव्हलमध्येही निवड

‘बाहुबली: द इटरनल वॉर’ या प्रोजेक्टची २०२६च्या अॅनेसी इंटरनॅशनल अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्क-इन-प्रोग्रेस प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. त्यामुळे या प्रोजेक्टला आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन क्षेत्रात महत्त्वाचं व्यासपीठ मिळणार आहे.

मर्चेंडायझिंगपासून गेमिंगपर्यंत संधी

ड्रीम थिएटरकडून ‘बाहुबली’साठी अॅपरेल, कलेक्टिबल्स, फिगर्स, बॅग्स, स्टेशनरी, पब्लिशिंग, गेमिंग आणि एक्सपिरिअन्शियल इनिशिएटिव्ह्ज अशा विविध क्षेत्रांमध्ये लायसन्सिंग आणि मर्चेंडायझिंगच्या संधी विकसित केल्या जाणार आहेत.

याशिवाय स्पॉन्सरशिप्स, ब्रँड असोसिएशन्स, प्रमोशनल कोलॅबोरेशन्स आणि को-ब्रँडेड उपक्रमांसाठीही काम केलं जाणार आहे. ‘बाहुबली’च्या चाहत्यांना या युनिव्हर्सशी जोडण्याचे नवे मार्ग उपलब्ध करून देणं हा या भागीदारीमागचा मुख्य उद्देश आहे.

Sharat Saxena: उभं राहून MRI करणाऱ्या शरत सक्सेनांचे फोटो चर्चेत; सर्जरीपूर्वी चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

एस.एस. राजामौली काय म्हणाले?

‘बाहुबली’ फ्रँचायझीचे क्रिएटर एस.एस. राजामौली यांनी या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला. ‘बाहुबली’मध्ये नेहमीच चित्रपटाच्या पलीकडे जाण्याची क्षमता होती आणि ‘द इटरनल वॉर’च्या माध्यमातून या विश्वाचा नव्या पद्धतीने शोध घेण्याची संधी मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं.

आर्का मीडिया वर्क्सचे सीईओ शोबू यारलागड्डा यांनीही या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं. ‘द इटरनल वॉर’च्या माध्यमातून ‘बाहुबली’ युनिव्हर्सला नव्या दिशेने घेऊन जाण्याची संधी मिळत असून, या विस्तारात लायसन्सिंग महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ड्रीम थिएटरचे फाउंडर आणि सीईओ जिग्गी जॉर्ज यांनीही ‘बाहुबली’ फ्रँचायझीसोबत काम करण्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली. भारतासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये या फ्रँचायझीशी संबंधित विविध संधी विकसित करण्यासाठी आर्का मीडिया वर्क्ससोबत काम करण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Drishyam 3: ‘धुरंधर’नंतर वाढली फीस अन् ‘दृश्यम 3’मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट? जयदीप अहलावतने सांगितलं खरं सत्य

Web Title: Baahubali global expansion dream theatre arka media works partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • hit movies

संबंधित बातम्या

Bigg Boss 20: अवघ्या ३ दिवसांत या स्पर्धकाने जिंकलं प्रेक्षकांचं मन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!
1

Bigg Boss 20: अवघ्या ३ दिवसांत या स्पर्धकाने जिंकलं प्रेक्षकांचं मन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा मोठा पुढाकार; ८ राज्यांत ८२० कार्यक्रम, ३ लाख मुलींपर्यंत पोहोचवला HPV लसीकरणाचा संदेश
2

Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा मोठा पुढाकार; ८ राज्यांत ८२० कार्यक्रम, ३ लाख मुलींपर्यंत पोहोचवला HPV लसीकरणाचा संदेश

ZEE5 New Look: कंटेंट शोधणं होणार आणखी सोपं; AIसह ZEE5चा नवा अवतार, Free5ही नव्या रूपात
3

ZEE5 New Look: कंटेंट शोधणं होणार आणखी सोपं; AIसह ZEE5चा नवा अवतार, Free5ही नव्या रूपात

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव
4

Tejaswini Lonari: थाटात पार पडलं तेजस्विनी -समाधान सरवणकरांच्या लेकाचं बारसं; चार अक्षरी ठेवलं राजेशाही नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.