Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेबी लेट्स डान्स’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘मी होणार सुपरस्टार’ फेम अपेक्षा लोंढेचा दमदार डान्स अवतार

'बेबी लेट्स डान्स' या गाण्याच्या घोषणेमुळेच संगीतप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आधुनिक संगीत, आकर्षक नृत्यरचना आणि दमदार सादरीकरणाचा संगम असलेले हे गाणे तरुणाईच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 03, 2026 | 04:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा एकदा नव्या संकल्पनेसह सज्ज झाली आहे.
  • गाणे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
  • घोषणेमुळेच संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मराठी म्युझिक अल्बम क्षेत्रात वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित गाणी सादर करणाऱ्या केपी फिल्म्स आणि ८ स्टुडिओकडून आता आणखी एक भन्नाट डान्सिकल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बेबी लेट्स डान्स’ या नव्या म्युझिक अल्बमची घोषणा करण्यात आली असून, आधुनिक संगीत, आकर्षक नृत्यरचना आणि स्टायलिश सादरीकरणाचा सुरेख मिलाफ या गाण्यात पाहायला मिळणार आहे. याआधी ‘मौसम इश्काचा’, ‘बहिण लाडकी’, ‘साजनी’, ‘तुला पाहून मी’, ‘राधा बासरी’ आणि ‘मराठी रॅपर’ यांसारख्या गाण्यांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ही टीम पुन्हा एकदा नव्या संकल्पनेसह सज्ज झाली आहे.

Soundous Moufakir : धर्माने मुस्लिम असून हिंदू पद्धतीने केली पूजा! सुरु केला व्यवसाय, कोण आहे ही अभिनेत्री?

या गाण्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार’ फेम नृत्यांगना अपेक्षा लोंढे हिचा दमदार डान्स परफॉर्मन्स. तिच्यासोबत जय इथापे आणि समृद्धी काळे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. नुकतेच या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्यामधील भव्य सेट्स, रंगतदार दृश्यरचना आणि ऊर्जावान नृत्यरचना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘बेबी लेट्स डान्स’ या गाण्याला गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका सोनाली सोनवणे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सजवले आहे. गाण्याची संकल्पना किशन पटेल यांची असून, दिग्दर्शनाची धुरा स्वप्नील पाटील यांनी सांभाळली आहे. संगीत, नृत्य आणि दृश्यरचनेचा प्रभावी मेळ घालत हे गाणे तरुणाईला विशेष आकर्षित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निर्मात्यांच्या मते, ‘बेबी लेट्स डान्स’ हे केवळ एक गाणे नसून संगीत आणि नृत्याचा उत्सव आहे. आधुनिक धाटणी, आकर्षक व्हिज्युअल्स आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे हे गाणे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

सध्या या गाण्याची पोस्टर आणि घोषणेमुळेच संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उत्कृष्ट संगीत, दमदार कोरिओग्राफी आणि कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय यामुळे ‘बेबी लेट्स डान्स’ हा म्युझिक अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून हे गाणे लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Baby lets dance of apeksha londhe coming soon to audiences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Marathi celebrities
  • Reality Show

संबंधित बातम्या

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..
2

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी
3

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.