फोटो सौजन्य - Social Media
या विशेष प्लॅनसाठी शौर्य आणि ऊर्जा वेषांतर करून थेट लग्नमंडपात पोहोचणार आहेत. पत्रकार आणि कॅमेरामनच्या रूपात दोघांची एंट्री होणार असून त्यांचा हा अनोखा लूक सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सत्य समोर आणण्यासाठी ते कोणती जोखीम पत्करतात आणि हर्षवर्धनच्या कारस्थानांना कसे आव्हान देतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शौर्यची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रनील कामत आणि ऊर्जाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सरकटे या नव्या लूकबद्दल विशेष उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. या वेषांतरासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली असून मेकअप आर्टिस्ट सिद्धेश परब आणि सुनील पवार यांनी लूक वास्तवदर्शी दिसावा यासाठी बारकाईने काम केले. इतकेच नव्हे तर शूटिंगदरम्यान सेटवरील अनेक जणांनीही पहिल्या नजरेत दोघांना ओळखले नाही.
या नव्या ट्विस्टमुळे मालिकेतील उत्कंठा आणखी वाढली आहे. शौर्य आणि ऊर्जाचा हा प्लॅन यशस्वी होणार का, पद्माचे लग्न थांबणार का आणि हर्षवर्धनच्या कटकारस्थानांचा अखेर पर्दाफाश होणार का, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.
‘वचन दिले तू मला’ ही मालिका दररोज सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. आगामी भागांमध्ये थरार, नाट्य आणि भावनिक घडामोडींचा संगम पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.






