(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांनी त्यांच्या नवीन घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
या खास पार्टीसाठी सिद्धार्थ आणि मितालीने सुंदर पोशाख परिधान केला होता. दोघांचाही लूक अतिशय ग्लॅमरस आणि देखणा दिसत होता. या पार्टीचे खास फोटो सिद्धार्थ आणि मितालीने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यांच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री क्षिती जोग, वैदेही परशुरामी, गायत्री दातार आणि अभिनेता शुभंकर तावडे यांच्यासह मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील अनेक दिग्गज कलाकार या पार्टीत सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येत दिवाळीचा आनंद लुटला.
पार्टीचे फोटो शेअर करत सिद्धार्थ आणि मितालीने आपल्या मित्रपरिवाराबद्दल खास भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिलं, "मैत्रीच्या बाबतीत आम्ही खरंच खूप नशीबवान आहोत. इतकी छान माणसं आमच्या आयुष्याचा भाग आहेत, यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी चांगलं केलं असणार."
त्यांच्या या कॅप्शनमधून मित्रपरिवाराबद्दलचं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त होते. सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरातील या दिवाळी पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहेत.