
फोटो सौजन्य - Social Media
बिग बॉस मराठी 6 दररोज अनपेक्षित वळणे घेत आहे. एकेक करून सगळे सदस्य घराबाहेर पडत आहेत तर एकेक करून काही सदस्य घरातही आले आहेत. पण आता बिगबॉसचं दार एकासाठी नव्हे तर अनेकांसाठी उघडणार आहे. बिग बॉसने यंदाच्या सीझनमध्ये Eviction Tweest अगदी दमदार ठेवले आहे. अनपेक्षित गोष्टी येथे घडत आहेत, अगदी विचारांच्या पलीकडचे आहे. बिग बॉसने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
नक्की काय आहे या Promo मध्ये?
मगरीच्या तोंडात सदस्यांना टाकायचे आहे. म्हणजे ज्याला नॉमिनेट करायचे आहे त्या सदस्यांच्या फोटोला मगरीच्या पुतळ्याच्या तोंडामध्ये टाकून द्यायचे आहे आणि आपले कारण स्पष्ट करायचे आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून आली आहे. कालच्या Eviction नंतर घरात सागर कारंडे आता एकटा पडल्याचे दिसून येत आहे. पण या शाब्दिक बाचाबाचीत सागर कारंडे आणि प्रभुमध्ये वाद झाल्याचे दिसून आले आहे. प्रभू म्हणत आहे की “मी इथे खेळ खेळायला आलोय, भजी तळायला नाही!” त्यावर सागर म्हणतो की “तू काहीही म्हणशील आणि मी ऐकून घेईल असे होणार नाही.”
तसेच खेळाच्या सुरुवातीपासून एकमेकांचे शत्रू असणारे विशाल कोटीयन आणि राकेश बापट, या सामन्यात एकमेकांशी वाद घालताना दिसून येत आहे. त्यामध्ये विशाल राकेशला म्हणतो की “जो आपल्या शब्दावर ठाम नाही. जीभेने फिरतो तो माणूस, माणूस नसतो!”
यंदाच्या आठवड्यात कोण -कोण जाईल? याचा निकाल तर सदस्यांच्या यंदाच्या आठवड्यातील खेळावर आणि प्रेक्षकांच्या हातात आहे. परंतु या प्रोमोने प्रेक्षकांना त्यांचे मत कमेंट्सच्या माध्यमातून मांडण्याची मुभा दिली आहे. एका प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, “Match पूर्ण आधीच Fix आहे. आपण Vote करू की नको करू, यंदाच्या आठवड्यात काटा ग्रुपचा एकही सदस्य घराबाहेर जाणार नाहीत.” असा आरोप केला असून दुसऱ्या प्रेक्षकांचे म्हणणे आहे की “यंदाच्या सीझनमध्ये पहिली तन्वी असेल, दुसरा राकेश, तिसरी दीपाली तर चौथा प्रभू!” अशी अनेक मतं प्रेक्षकांनी दिली आहेत.