Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kon Honar Crorepati: आई आज असती तर माझ्या खांद्यावर ३ स्टार असते…” KBC च्या मंचावर डिलिव्हरी बॉयची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी!

Kon Honar Crorepati: सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या मंचावर डिलिव्हरी बॉय जगदीश कांबळे यांनी आपल्या संघर्षाची आणि कुटुंबाच्या विखुरलेल्या प्रवासाची भावूक कहाणी सांगितली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 05, 2026 | 05:26 PM
Kon Honar Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Kon Honar Crorepati: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • डिलिव्हरी बॉय जगदीश कांबळेंनी सांगितली संघर्षकहाणी.
  • आईच्या आठवणीने KBC च्या मंचावर जगदीश भावूक.
  • माधुरी दीक्षितही जगदीश यांच्या शब्दांनी हेलावल्या.

मोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी परिस्थिती नव्हे, तर जिद्द महत्त्वाची असते, हे जगदीश कांबळे यांनी दाखवून दिलं. सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर एका सामान्य डिलिव्हरी बॉयनं आपल्या संघर्षाची आणि विखुरलेल्या कुटुंबाची कहाणी सांगत सर्वांची मनं जिंकली. हा भाग केवळ एका स्पर्धकाचा राहिला नाही, तर तो एका लेकराने मंचावरून आपल्या आईला मारलेली आर्त हाक ठरला. Kon Honar Crorepati:

प्रामाणिक वक्तव्य ऐकून माधुरी दीक्षित भावूक

कोण होणार करोडपतीमध्ये येण्याचं, माधुरी दीक्षित यांना भेटण्याचं आणि त्यांच्यासमोर हॉट सीटवर बसण्याचं जगदीश यांचं स्वप्न होतं. या खास क्षणासाठी त्यांनी मित्राकडून अडीज हजार रुपये उधार घेतले आणि त्यातून चारशे रुपयांचा शर्ट व हजार रुपयांची पॅण्ट आणि हजार रुपयांचे बूट खरेदी केले. मात्र या कपड्यांवर बूट मॅच होत नव्हते म्हणून त्यांना रोजच्याच वापरातली सॅंडल घालून यावं लागलं. ही सॅन्डल सुद्धा फाटकी आहे असं त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं. त्यांचा साधा भोळा स्वभाव आणि प्रामाणिक वक्तव्य ऐकून माधुरी दीक्षित सोबत सगळ्यांचंच मन हेलावलं.

आयुष्यात निर्माण झालेली पोकळी

पण जगदीश यांच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती. गप्पांच्या ओघात त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि वेदनादायी पैलू समोर आला. वडिलांच्या त्रासामुळे जगदीश यांची आई त्यांना आणि कुटुंबाला सोडून निघून गेली होती. आईच्या जाण्यानं त्यांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि तिची उणीव त्यांना प्रत्येक क्षणी जाणवत आहे.

Bigg Boss Marathi 7: बिग बॉस मराठी ७ मध्ये कोणाची लागणार वर्णी? सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टने वाढवली उत्सुकता

जगदीश अत्यंत भावूक

हॉट सीटवर बसून आईची आठवण काढताना जगदीश अत्यंत भावूक झाले. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणाले, “आज जर माझी आई सोबत असती, तर माझ्या छातीवर तीन स्टार असते…” पुढे थेट कॅमेऱ्याकडे पाहत त्यांनी आपल्या आईला साद घातली, “आई, तू कुठेही असशील आणि हा कार्यक्रम पाहत असशील तर परत ये, मी तुला काही विचारणार ना, काही बोलणार नाही…” जगदीश यांच्या या आर्त हाकेने मंचावर एकच शांतता पसरली आणि उपस्थित प्रत्येकाचं मन हेलावलं.

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितने उलगडलं ९० च्या दशकातील स्टारडमचं गुपित; आजच्या ट्रोलिंगबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

भावनांना हक्काचं व्यासपीठ देणारा मंच

माधुरी दीक्षित यांनी जगदीश यांच्या साधेपणाचं, प्रामाणिकपणाचं आणि त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नोत्तरांचा खेळ नसून सामान्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या वेदनांना आणि भावनांना हक्काचं व्यासपीठ देणारा मंच आहे, हे या भागाने पुन्हा एकदा सिद्ध केले. पहा ‘कोण होणार करोडपती’, सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी आणि सोनी लिव वर.

Web Title: Kon honar crorepati jagdish kamble emotional story madhuri dixit rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainement News
  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!
1

Jio vs Airtel: खिशाला परवडणारा डेटा प्लॅन कोणाचा? Jio-Airtel च्या स्वस्त रिचार्जमध्ये चुरस!

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक
2

Jio 15 Rupees Plan: मोठ्या फाइल्स डाउनलोड करा बिनधास्त! Jio चा 15 रुपयांचा डेटा पॅक

Ration Card Benefits: रेशन कार्डचे महत्त्व ओळखा! मोफत गॅस अन् लाखोंच्या उपचारांसाठी जाणून घ्या कागदपत्रांची माहिती
3

Ration Card Benefits: रेशन कार्डचे महत्त्व ओळखा! मोफत गॅस अन् लाखोंच्या उपचारांसाठी जाणून घ्या कागदपत्रांची माहिती

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत
4

National Insurance Apprentice Jobs: सरकारी विमा क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.