
फोटो सौजन्य - Social Media
रेवा कौरासे यंदाच्या सीझनमधील शेवटची Wild Card सदस्य होती. दरम्यान, तिला शांत आणि सज्जन समजण्याची इतर Wild Card सदस्यांनी चूक केली. आपल्या बुद्धिमतेच्या जोरावर सगळ्या Wild Card ला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवणारी खेळाच्या शेवटपर्यंत टिकणारी Wild Card सदस्य म्हणून रेवाने बाजी मारली. रेवा Top 5 चा भाग बनू शकली नाही पण Bigg Boss Marathi 6 च्या Top 6 सदस्यांमध्ये रेवाचे नाव कोरले गेले आहे.
गेल्या आठवड्यात, Bigg Boss Marathi Season सहाव्यातील पहिलीवहिली Wild Card सदस्य राखी सावंत Evict झाली होती. इतकेच नव्हे तर राखीने तिला मिळणारी सगळी रक्कम तिने विजेताच्या नावावर करवून दिली आणि राखीने केलेल्या 16 पर्वांमध्ये हे पहिल्यांदाच घडले होते. रेवा कौरासे Evict झाल्याची बातमी कळताच घरातील Top 5 सदस्यांना अश्रू अनावर झाले. रेवा कौरासे काटा ग्रुपमधली सदस्य होती. तसेच काटामधून निघणारी प्रभुनंतर रेवा दुसरी सदस्य आहे.
मुळात, बिग बॉसच्या घरामध्ये टोळी, काटा आणि बाल्कनी असे तीन ग्रुप होते. पण यातील बाल्कनी ग्रुप पूर्णपणे घराबाहेर झाला आहे तर टोळीतील विशाल आणि अनुश्रीच घरात खेळात आहेत. यंदाच्या पर्वातील सगळ्यात मजबूत संघ म्हणून काटा ठरला आहे. काटाचे फक्त दोन सदस्य घराबाहेर झाले आहेत: प्रभू शेळके, रेवा कौरासे!