फोटो सौजन्य - Social Media
संजूचं ‘Bangles’ हे नवंकोरं गाणं स्वतः संजू राठोडनेच गायले आहे. या गाण्याची Composition संजू राठोडने केली असून गाण्याचे Lyrics संजूनेच लिहले आहेत. गाण्यामध्ये Shaky Shaky फेमी Isha Malvia झळकणार आहे. बँगल्सला G – Spark ने संगीतबद्ध केले आहे पियुष-शाझिया या जोडीने या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे.
डोक्यावर टोपी, गळ्यात टाय…
संजू राठोडने ‘Bangles’ गाण्याच्या पोस्टरमध्ये केलेला Look फार चर्चेत येत आहे. संजूने ब्लेजर परिधान केला आहे. डोक्यावर लाल रंगाची टोपी आणि गळ्यात टाय असा Formal लुक दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला Isha Malvia ने Hot Look केला आहे. ‘Bangles’ या गाण्याच्या नावाप्रमाणेच Poster मध्येही सगळीकडे बांगड्या दिसून येत आहेत. गुलाबी साडी झालं, काली बिंदी झाली आता संजूने बांगड्या या साजेला पकडून पुन्हा मराठी Hit देण्याचे नियोजन आखले असल्याचे Poster च्या माध्यमातून कळून येत आहे.
Poster पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रिया
संजू राठोडच्या ‘Bangle’ गाण्याचे पोस्टर पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या गाण्याला ‘Shaky Shaky 2.0’ असे नाव दिले आहे. तर ‘SANJU X ISHA’ या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे कमेंट्समध्ये दिसून येत आहे. अनेकांनी तर संजूचं गाणं आहे म्हणजे Blockbuster च असणार असे आताच जाहीर केले आहे.
संजूचं नवंकोरं गाणं ‘Bangle’ कधी प्रदर्शित होणार? याबद्दल कोणत्याही प्रकारची अधीकृत माहिती देण्यात आली नाही. गाणं कधी येणार? याची तारिख Sanju Rathod च्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून लवकरच जाहीर करण्यात येईल.






