Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bipasha Basu Comeback: तब्बल ६ वर्षांनी बिपाशा बसुचं कमबॅक; हंसल मेहतांच्या ‘या’ सीरिजमधून OTTवर करणार पुनरागमन

Bipasha Basu Comeback: बिपाशा बसू तब्बल ६ वर्षांनी अभिनयाच्या दुनियेत कमबॅक करत आहे. हंसल मेहतांच्या ‘बाराबंकी’ या क्राइम थ्रिलर सीरिजमधून ती OTTवर पुनरागमन करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 07, 2026 | 10:59 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bipasha Basu Comeback: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून दूर आहे. मात्र, आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बिपाशा पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती मोठ्या पडद्यावर नव्हे, तर हंसल मेहता यांच्या आगामी क्राइम थ्रिलर सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या कमबॅकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

‘बाराबंकी’मधून बिपाशाचं कमबॅक

बिपाशा बसू हंसल मेहता यांच्या आगामी ‘बाराबंकी’ या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचं मुंबईत चित्रीकरण सुरू झालं असून, बिपाशाने गेल्या महिन्यापासून शूटिंगला सुरुवात केल्याचं वृत्त आहे. हंसल मेहता आणि बिपाशा बसू पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत आहेत.

‘बाराबंकी’ ही सीरिज निवृत्त IPS अधिकारी आलोक लाल यांच्या The Barabanki Narcos: Busting India’s Most Notorious Drug Cartel या पुस्तकावर आधारित आहे. १९८४ मध्ये उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील शक्तिशाली अफूच्या तस्करीविरोधात करण्यात आलेल्या मोठ्या कारवाईची कथा या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

सनी कौशल आणि विशाल जेठवाही महत्त्वाच्या भूमिकेत

‘बाराबंकी’मध्ये बिपाशा बसूसोबत सनी कौशल आणि ‘होमबाउंड’ फेम विशाल जेठवा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मात्र, त्यांच्या व्यक्तिरेखांबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. बिपाशाच्या भूमिकेबाबतही सध्या फारशी माहिती समोर आलेली नाही.

मात्र, बिपाशाची या सीरिजमधील भूमिका दमदार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकनंतर ती कोणत्या नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!

‘डेंजरस’नंतर सहा वर्षांनी अभिनयात पुनरागमन

बिपाशा बसूचा शेवटचा चित्रपट ‘अलोन’ होता, जो २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०२० मध्ये तिने ‘डेंजरस’ या थ्रिलर सीरिजमधून OTT विश्वात पदार्पण केलं. आता जवळपास सहा वर्षांनंतर ती पुन्हा एका मोठ्या प्रोजेक्टमधून अभिनयात सक्रिय होत आहे.

२०१६ मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हरसोबत लग्न केल्यानंतर बिपाशाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला. २०२२ मध्ये ती आणि करण सिंग ग्रोव्हर आई-वडील झाले. त्यांच्या मुलीचं नाव देवी आहे. त्यानंतर बिपाशा मोठ्या प्रमाणावर कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसली.

आता मात्र बिपाशाने पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बाराबंकी’च्या निमित्ताने तिचं हे कमबॅक कसं ठरतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?

Web Title: Bipasha basu comeback hansal mehta barabanki web series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • bipasha basu
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!
1

OTT Release: या आठवड्यात OTTवर होणार मनोरंजनाचा ‘घमासान’; ‘सिरफिरे’ही घेऊन येणार क्रांतीची मशाल!

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!
2

Bigg Boss 20: घरात एन्ट्री करताच माही विजचा हुकूम सुरू; कोणाकडून बनवली चहा, तर कोणाकडून उचललं सामान!

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?
3

Bigg Boss 20: बिग बॉसमध्ये पुण्याच्या मराठमोळ्या रॅपरची एन्ट्री; ‘Yeda Yung’ फेम Yung DSA कोण?

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक
4

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.