Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणाईला ठेका धरायला लावणार ‘चंद्राची कोर’, लग्नसोहळ्यातील हळवी प्रेमकथा ठरतेय चर्चेचा विषय

लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा सांगणारं ‘चंद्राची कोर’ हे नवं मराठी गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. निक शिंदे आणि सृष्टी आंबवले यांची जोडी, विजय भाटे यांचं संगीत आणि सोनाली सोनावणे-रवींद्र खोमणे यांचा आवाज गाण्याचं आकर्षण ठरत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 23, 2026 | 01:54 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी संगीतविश्वात सध्या अल्बम गाण्यांची आणि त्यातील कलाकारांची क्रेझ वाढताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संगीत रसिकांसाठी एक नवीन गाणं भेटीला आलं आहे. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि संदेश विठ्ठल गाडेकर, सुरेश विठ्ठल गाडेकर निर्मित ‘चंद्राची कोर’ हे नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सोशल मीडियावर या गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

लग्नसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा या गाण्यातून मांडण्यात आली आहे. प्रेम, भावना आणि नात्यांची हळुवार गुंफण असलेल्या या गाण्याला आजच्या तरुणाईला आकर्षित करणारा आधुनिक संगीताचा साज देण्यात आला आहे. गाण्यातील दमदार ठेका, सुंदर व्हिज्युअल्स आणि कलाकारांचा डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या गाण्यात अभिनेता निक शिंदे आणि अभिनेत्री सृष्टी आंबवले यांची जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हे या गाण्याचं खास आकर्षण ठरत आहे.

Priyadarshini Chatterjee Engaged: समुद्रकिनाऱ्यावर गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडने केलं प्रपोज; प्रियदर्शिनीने दिली प्रेमाची कबुली

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक विजय भाटे यांनी ‘चंद्राची कोर’ला संगीत दिलं असून, गायिका सोनाली सोनावणे आणि गायक रवींद्र खोमणे यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चाँद लावले आहेत. तर गीतकार करण सावंत यांनी लिहिलेले शब्द गाण्याच्या भावनांना अधिक सुंदर बनवतात.

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल

गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी मानसी आणि दीपक या जोडीने सांभाळली आहे. आधुनिक सादरीकरण, आकर्षक लोकेशन्स आणि भावनिक कथानक यामुळे ‘चंद्राची कोर’ हे गाणं सोशल मीडिया ट्रेंडमध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिग्दर्शक जोडी मानसी आणि दीपक यांनी सांगितलं की, या गाण्यात फक्त डान्स नसून एक सुंदर भावनिक कथा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि फ्रेश अनुभवायला मिळावा यासाठी टीमने मेहनत घेतली आहे.

Web Title: Chandrachi kor gets the youth grooving a heartwarming wedding love story becomes the talk of the town

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • viral Song

संबंधित बातम्या

Amruta Fadnavis : आता रुपेरी पडद्यावर वाजणार अमृता फडणवीसांचा गाणं! ‘दीवाने हैं’ गाणं प्रत्येकाला दिवाना करण्यास सज्ज
1

Amruta Fadnavis : आता रुपेरी पडद्यावर वाजणार अमृता फडणवीसांचा गाणं! ‘दीवाने हैं’ गाणं प्रत्येकाला दिवाना करण्यास सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.