Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर

Char Yaar Web Series: २००० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘चार यार’ या क्राइम ड्रामा मालिकेचा प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राइम व्हिडिओवर होणार आहे. सई ताम्हणकर, सिकंदर खेर आणि चंकी पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 09, 2026 | 12:18 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Char Yaar Web Series:  प्राइम व्हिडिओच्या आगामी हिंदी क्राइम ड्रामा मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ‘चार यार’ या मालिकेचा जागतिक प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून, मैत्री, महत्त्वाकांक्षा आणि गुन्हेगारी विश्वाचा थरार यांचा अनोखा संगम यात पाहायला मिळणार आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा रंगणार आहे.

या मालिकेत पुरव झा, नमन जैन, साकिब अय्युब आणि प्रयार्क मेहता हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सई ताम्हणकर, सिकंदर खेर, दिव्येंदू भट्टाचार्य, राजेश तैलंग, चंकी पांडे आणि भगवती पेरुमल हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

चार मित्रांची कहाणी; एका निर्णयाने बदलणार आयुष्य

‘चार यार’ ही मालिका जय, टोनी, साहिल आणि समीर या चार मित्रांची कथा सांगते. मध्यमवर्गीय जीवनातील संघर्ष, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि चांगल्या भविष्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या या मित्रांची मैत्री त्यांच्या अडचणींमुळे अधिक घट्ट होत जाते. मात्र, परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नात ते एक असा निर्णय घेतात, जो त्यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण देतो.

गरजेपोटी घेतलेला हा निर्णय त्यांना गुन्हेगारीच्या जगात ओढतो. गँगस्टर्स, पोलीस आणि सततचा पाठलाग अशा धोकादायक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते. परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक पाऊल त्यांना नव्या संकटाच्या जवळ घेऊन जाते. अशा वेळी त्यांची मैत्रीच त्यांच्यासाठी सर्वात मोठे बळ ठरते. त्यामुळे मालिकेत मैत्रीतील भावनिक बंधांसोबतच थरारक घटनांचीही मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

विनय वायकुळ यांचे दिग्दर्शन

‘चार यार’ या मालिकेचे दिग्दर्शन विनय वायकुळ यांनी केले आहे, तर संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांनी लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. पिंक विंडो प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली प्रणती नगरशेठ, निरज नगरशेठ आणि पी. एस. श्याम यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. बीबीसी स्टुडिओज इंडियाने विकसित केलेल्या या मालिकेची निर्मिती संकल्पना विनय वायकुळ, एस. हुसेन झैदी, संबित मिश्रा आणि सौरभ सावंत यांची आहे.

प्राइम व्हिडिओ आणि अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या ओरिजिनल्स विभागाचे संचालक आणि प्रमुख निखिल माधोक यांनी मालिकेबद्दल सांगितले की, ‘चार यार’मध्ये मैत्री, महत्त्वाकांक्षा, विनोद आणि अनपेक्षित ट्विस्ट यांचा सुरेख मेळ आहे. तरुण कलाकारांच्या अभिनयासोबतच विनय वायकुळ यांच्या दिग्दर्शनामुळे कथेला वेगळी रंगत मिळाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

२३ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडिओवर

‘चार यार’चा जागतिक प्रीमियर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी केवळ प्राइम व्हिडिओवर होणार आहे. भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ही मालिका हिंदी भाषेत पाहता येणार आहे. मैत्री, संघर्ष आणि गुन्हेगारीच्या थराराने भरलेली ही कथा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Web Title: Char yaar web series prime video premiere date sai tamhankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • Sai Tamhankar
  • Web Series

संबंधित बातम्या

Aarti Solanki On Sai Tamhankar: ‘अभिनयाचा अ ही माहीत नाही तरी सुपरस्टार!’ सई ताम्हणकरसाठी आरती सोलंकीची परखड पोस्ट, नेमकं काय घडल?
1

Aarti Solanki On Sai Tamhankar: ‘अभिनयाचा अ ही माहीत नाही तरी सुपरस्टार!’ सई ताम्हणकरसाठी आरती सोलंकीची परखड पोस्ट, नेमकं काय घडल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.