Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi 2021 Trailer: ऑक्सिजन सिलेंडरसाठी मोजावे लागणार २ लाख रुपये? सोनाली कुलकर्णी च्या ‘दिल्ली २०२१’चा थरारक ट्रेलर रिलीज

Delhi 2021 Trailer: ऋचा चड्ढा, सुमीत व्यास आणि सोनाली कुलकर्णी यांच्या ‘दिल्ली २०२१’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. कोरोनाकाळातील ऑक्सिजन तुटवडा आणि रुग्णालयांमधील भयावह परिस्थिती दाखवणारा हा चित्रपट २५ नोव्हेंबरला ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 21, 2026 | 02:47 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Delhi 2021 Trailer: २०२१ साली कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. भारतानेही आपल्या इतिहासातील सर्वात आव्हानात्मक काळ अनुभवला. या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांनी लाखो रुपये खर्च करूनही आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यापासून ते ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यापर्यंत सर्वसामान्यांची मोठी धावपळ सुरू होती. अशा कठीण परिस्थितीत काही जणांनी संधी साधत ऑक्सिजन सिलिंडर तब्बल २ लाख रुपयांना विकल्याचेही समोर आले होते. याच काळातील काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आता ‘दिल्ली २०२१’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. रिचा चड्ढा, सुमीत व्यास, गुलशन ग्रोव्हर, सुष्मिता मुखर्जी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘दिल्ली २०२१’च्या ट्रेलरमध्ये दिसणार कोरोनाकाळातील भयावह वास्तव

‘दिल्ली २०२१’चा ट्रेलर कोविड-१९ महामारीच्या काळातील दिल्लीतील भयावह परिस्थिती दाखवतो. रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत होते, तर रुग्णांचे कुटुंबीय मदतीसाठी हतबल झाले होते.

अभिषेक आचार्य यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथा एसएल क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का, अशी विचारणा करणारा फोन येतो. त्यावर बेड उपलब्ध असल्याचे सांगितले जाते; मात्र रुग्णाला आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले जाते.

यानंतर सुमीत व्यास यांचे पात्र संताप व्यक्त करताना दिसते. “एक जण लस बनवतोय, दुसरा विषाणू बनवतोय, आणि ते दोघे मिळून आमची वाट लावत आहेत,” असा संवाद ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो.

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली

ऑक्सिजनचा तुटवडा आणि औषधांसाठीची धडपड

ट्रेलरमध्ये रिचा चड्ढा, सोनाली कुलकर्णी आणि इतर डॉक्टर महामारीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा सामना करताना दिसतात. डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना रुग्णालयाबाहेरील गोंधळ, ऑक्सिजनचा काळाबाजार आणि रुग्णांच्या कुटुंबीयांची असहायता यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचेही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. याशिवाय टोसिलोमॅक्स नावाच्या औषधाचीही चर्चा होते. प्रभावी मानले जाणारे हे औषध उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांसमोर आणखी मोठे आव्हान उभे राहते. “कोविड कोणालाच कळत नाही, डॉक्टरसुद्धा झगडत आहेत,” असे पात्र म्हणताना दिसतात.

‘आम्हाला ऑक्सिजन मिळवून द्या’; शेवटचा प्रसंग भावूक करणारा

ट्रेलरमधील शेवटचा प्रसंग विशेष लक्ष वेधून घेतो. एसएल क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. कनिका सक्सेना मदतीसाठी आर्त विनंती करताना दिसतात. “जर आम्हाला पुढच्या दोन तासांत ऑक्सिजन आणि मदत मिळाली नाही, तर अनेक रुग्णांना वाचवणे कठीण होईल. कृपया आम्हाला मदत करा आणि आतापर्यंत ऑक्सिजन मिळवून द्या,” असे त्या म्हणतात. हा प्रसंग पाहून प्रेक्षकांना कोरोनाकाळातील कठीण दिवसांची आठवण होऊ शकते.

‘दिल्ली २०२१’ कधी आणि कुठे पाहता येणार?

ट्रेलरसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. अभिषेक आचार्य दिग्दर्शित ‘दिल्ली २०२१’ हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झी५ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कोरोना महामारीच्या काळातील संघर्ष, डॉक्टरांची धडपड आणि माणुसकीची परीक्षा मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Delhi 2021 trailer released richa chadha sonali kulkarni zee5

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • entertainment
  • sonali kulkarni

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली
1

Shah Rukh Khan King Movie: शाहरुख-सुहानाच्या पहिल्या झलकसाठी काउंटडाऊन सुरू! ‘किंग’च्या ट्रेलरची तारीख ठरली

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव
2

DPIFF Awards 2026: ‘धुरंधर’चा दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात डंका! रणवीर सिंह, अक्षय खन्नासह अनेक कलाकारांचा गौरव

Anupam Kher: एकच घर होतं, तेही आलिया भट्टला विकलं! अनुपम खेर यांनी संपत्तीच्या चर्चांवर सोडलं मौन
3

Anupam Kher: एकच घर होतं, तेही आलिया भट्टला विकलं! अनुपम खेर यांनी संपत्तीच्या चर्चांवर सोडलं मौन

Actor Danesh Razvi: ‘तीन तिगाडा’मधील मानसच्या भूमिकेने वेधले लक्ष; अभिनेता दानेश रिझवीने सांगितले व्यक्तिरेखेचे खास पैलू!
4

Actor Danesh Razvi: ‘तीन तिगाडा’मधील मानसच्या भूमिकेने वेधले लक्ष; अभिनेता दानेश रिझवीने सांगितले व्यक्तिरेखेचे खास पैलू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.