Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

Eisha Singh Avinash Mishra: ईशा सिंहने अविनाश मिश्राला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने ब्रेकअपच्या चर्चांना उधाण! काही दिवसांपूर्वीच दोघांनी पार्टीत एकमेकांना म्हटलं होतं ‘आय लव्ह यू’.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 17, 2026 | 03:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Eisha Singh Avinash Mishra: बिग बॉस १८’मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ईशा सिंह आणि खतरों के खिलाडी १५चा विजेता अभिनेता अविनाश मिश्रा यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या दोघांच्या मैत्रीची आणि जवळिकीची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडत होती. काही दिवसांपूर्वीच ‘खतरों के खिलाडी १५’च्या सक्सेस पार्टीमध्ये दोघांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता ईशाने सोशल मीडियावर अविनाशला अनफॉलो केल्याने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

ईशाने अविनाशला केलं अनफॉलो; नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, ईशा सिंह आता इन्स्टाग्रामवर अविनाश मिश्राला फॉलो करत नाही. विशेष म्हणजे, अविनाश मात्र अजूनही ईशाला फॉलो करत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचा अंदाज चाहते व्यक्त करत आहेत. ईशाच्या या कृतीने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याबाबत किंवा संभाव्य दुराव्याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

ईशाच्या आईची रहस्यमयी पोस्ट चर्चेत

ईशाने अविनाशला अनफॉलो केल्यानंतर तिची आई रेखा सिंह यांची एक इन्स्टाग्राम स्टोरीही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक रहस्यमयी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘वेळ प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचा आरसा नक्की दाखवते. म्हणूनच कोणाच्या वागण्यामुळे स्वतःला कधीही खचू देऊ नका. योग्य मार्ग म्हणजे शांत राहून आपल्या वाटेने पुढे जात राहणे, कारण उत्तर शब्द देत नाहीत, तर वेळ देते.’

रेखा सिंह यांच्या या पोस्टचा संबंध ईशा आणि अविनाश यांच्या नात्याशी असल्याचा अंदाज काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे. ईशाने केलेले अनफॉलो आणि तिच्या आईची ही पोस्ट या दोन्ही गोष्टी जोडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच एकमेकांना म्हणाले होते ‘आय लव्ह यू’

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अविनाश मिश्रा यांच्या ‘खतरों के खिलाडी १५’च्या सक्सेस पार्टीमध्ये ईशा आणि अविनाश एकमेकांच्या खूप जवळ दिसले होते. या पार्टीदरम्यान अविनाशने ईशाचे आभार मानताना ती आपल्या आयुष्यात असल्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजतो, असे म्हटले होते. त्यानंतर ईशाने त्याला पुढे बोलण्यास सांगितले. यावर अविनाशने ‘आय लव्ह यू, बेबी’ असे म्हटले, तर ईशानेही ‘आय लव्ह यू टू’ म्हणत त्याला प्रतिसाद दिला.

दोघांमधील हा संवाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे आता अचानक ईशाने अविनाशला अनफॉलो केल्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!

‘बिग बॉस १८’पासून सुरू झाली होती जवळीक

‘बिग बॉस १८’च्या घरात ईशा सिंह आणि अविनाश मिश्रा यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली होती. शो संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम होती. इतकेच नाही, तर अलीकडेच दोघे ‘पती, पत्नी और पंगा २’ या टीव्ही शोमध्येही एकत्र दिसले होते. त्यांच्या जवळिकीमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबाबत अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. आता मात्र सोशल मीडियावरील या घडामोडींमुळे त्यांच्या नात्यात नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चर्चांवर ईशा किंवा अविनाश काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Eisha singh unfollow avinash mishra breakup rumours ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Avinash Mishra
  • entertainment

संबंधित बातम्या

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!
1

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार
2

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

Tumbbad 2: ‘तुंबाड’च्या रहस्यमय दुनियेत पुन्हा रंगणार जेस्पर किड यांचे संगीत; सोहम शाह यांनी दिली महत्त्वाची अपडेट!
3

Tumbbad 2: ‘तुंबाड’च्या रहस्यमय दुनियेत पुन्हा रंगणार जेस्पर किड यांचे संगीत; सोहम शाह यांनी दिली महत्त्वाची अपडेट!

Jijai Movie: रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’च्या ट्रेलरने जिंकली बॉलिवूडकरांची मनं; दिग्गज कलाकारांकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन!
4

Jijai Movie: रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’च्या ट्रेलरने जिंकली बॉलिवूडकरांची मनं; दिग्गज कलाकारांकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.