Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jijai Movie: रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’च्या ट्रेलरने जिंकली बॉलिवूडकरांची मनं; दिग्गज कलाकारांकडून संपूर्ण टीमचे अभिनंदन!

Jijai Movie: रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच बॉलिवूडकरांनी केले कौतुक. रितेश देशमुख, के. के. मेनन यांच्यासह अनेक कलाकारांनी दिल्या शुभेच्छा. चित्रपट २० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 17, 2026 | 12:08 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jijai Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आगामी चित्रपटांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच झी स्टुडिओज प्रस्तुत ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘जिजाई’च्या ट्रेलरला बॉलिवूडकरांची पसंती; रितेश देशमुखसह दिग्गज कलाकारांकडून कौतुक

अभिनेत्री रिंकू राजगुरू मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ प्रेक्षकांचेच नव्हे, तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचेही लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडकरांनी सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे.

अभिनेता रितेश देशमुख, कुमुद मिश्रा, के. के. मेनन, निवेदिता भट्टाचार्य, दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, वासन बाला, स्वानंद किरकिरे, मनीष चौधरी आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी ‘जिजाई’च्या ट्रेलरला पसंती दिली आहे. या मान्यवरांनी ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले असून, आगामी चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. बॉलिवूडमधील या दिग्गजांकडून मिळालेली कौतुकाची थाप ‘जिजाई’च्या टीमसाठी नक्कीच विशेष ठरली आहे.

Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा! धीरज धूपर दुसऱ्यांदा होणार बाबा

स्त्रीची जिद्द आणि आत्मसन्मानाची कहाणी; रिंकू राजगुरूच्या भूमिकेने वेधले लक्ष

‘जिजाई’च्या ट्रेलरमध्ये एका स्त्रीची जिद्द, आत्मसन्मान आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद पाहायला मिळते. आयुष्यातील संघर्षांना सामोरे जात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या स्त्रीची प्रभावी कथा या चित्रपटातून उलगडणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. रिंकू राजगुरूच्या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ‘जिजाई’ची चर्चा रंगू लागली आहे.

तृशांत फुलवंती इंगळे यांचे दिग्दर्शन; २० नोव्हेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत फुलवंती इंगळे यांनी केले असून, झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्सने निर्मिती केली आहे. नुपूर गुहा आणि तुषार राऊत हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रिंकू राजगुरूसोबत किशोर कदम, मयूर मोरे, रोहित कोकाटे आणि सानिका दिवाण हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. येत्या २० नोव्हेंबरला ‘जिजाई’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bigg Boss 20: मनीष गोयलच्या समर्थनार्थ पत्नी पूनम नरुला मैदानात! काजी तौकीरला सुनावलं, ‘प्रोफेसर’च्या रागामागचं कारणही सांगितलं

Web Title: Jijai movie trailer released impresses bollywood celebrities congratulate team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

Zee Marathi Serials: कुठे प्रेमाची नवी चाहूल, तर कुठे नात्यांमध्ये नवा पेच! झी मराठीच्या मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?
1

Zee Marathi Serials: कुठे प्रेमाची नवी चाहूल, तर कुठे नात्यांमध्ये नवा पेच! झी मराठीच्या मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा! धीरज धूपर दुसऱ्यांदा होणार बाबा
2

Dheeraj Dhoopar-Vinny Arora: टीव्ही अभिनेत्याच्या घरी पुन्हा हलणार पाळणा! धीरज धूपर दुसऱ्यांदा होणार बाबा

Bigg Boss 20: मनीष गोयलच्या समर्थनार्थ पत्नी पूनम नरुला मैदानात! काजी तौकीरला सुनावलं, ‘प्रोफेसर’च्या रागामागचं कारणही सांगितलं
3

Bigg Boss 20: मनीष गोयलच्या समर्थनार्थ पत्नी पूनम नरुला मैदानात! काजी तौकीरला सुनावलं, ‘प्रोफेसर’च्या रागामागचं कारणही सांगितलं

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये मोठं सरप्राइज! शाहरुख खानसह करण जोहरची जुळी मुलंही झळकणार
4

Koffee With Karan 9 Finale: ‘कॉफी विथ करण ९’च्या फिनालेमध्ये मोठं सरप्राइज! शाहरुख खानसह करण जोहरची जुळी मुलंही झळकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.