Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Engineers Day निमित्त जाणून घ्या इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्या बॉलिवूड कलाकारांबद्दल. कृती सॅनॉन, विकी कौशल, कार्तिक आर्यन, तापसी पन्नू, आर. माधवनसह सुशांत सिंह राजपूतचा शैक्षणिक प्रवास.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 15, 2026 | 03:35 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Engineers Day: दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो. भारतातील प्रसिद्ध अभियंता आणि भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर तंत्रज्ञान, संशोधन आणि गणिताशी संबंधित क्षेत्रं येतात. मात्र, बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यापूर्वी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.

यातील काही कलाकारांनी प्रतिष्ठित संस्थांमधून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली, तर काहींनी अभिनयाच्या स्वप्नासाठी शिक्षणाचा मार्ग मध्येच बदलला. कृती सॅनॉन, विकी कौशल, कार्तिक आर्यन, तापसी पन्नू आणि आर. माधवन यांच्यासह दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचाही या यादीत समावेश होतो.

कृती सॅनॉनने घेतली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनची पदवी

अभिनेत्री कृती सॅनॉन हिने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनयासोबतच तिची शैक्षणिक पार्श्वभूमीही तितकीच प्रभावी आहे. तिने दिल्लीतील आर.के. पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं.

१२वी नंतर कृतीने नोएडातील जयपी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेकची पदवी मिळवली. तिने GMAT परीक्षाही दिली होती आणि ७१० गुण मिळवले होते.

विकी कौशलनेही केलं इंजिनिअरिंग

अभिनेता विकी कौशल याने मुंबईतील शेठ चुनीलाल दाबोदरदास बर्फीवाला हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २००९ मध्ये त्याने राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

पदवी घेतल्यानंतर विकीने नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, एका औद्योगिक दौऱ्यादरम्यान आपल्याला ऑफिसमधील नोकरीत रस नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि किशोर नामित कपूर यांच्या अभिनय अकादमीत प्रवेश घेतला.

कार्तिक आर्यनने केलं बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन याने ग्वाल्हेरमधील सेंट पॉल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच कार्तिकने मॉडेलिंगलाही सुरुवात केली. पुढे त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

तापसी पन्नूने केली सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी

अभिनेत्री तापसी पन्नू हिने दिल्लीमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने गुरू तेग बहादूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची पदवी मिळवली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर तापसीने काही काळ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामही केलं. मात्र, पुढे मॉडेलिंगकडे तिचा कल वाढला. २००८ मध्ये ‘चॅनल व्ही’च्या ‘गेट गॉर्जियस’ या टॅलेंट शोसाठी तिची निवड झाली आणि तिच्या मॉडेलिंग कारकिर्दीला सुरुवात झाली.

‘3 इडियट्स’च्या माधवननेही केलं इंजिनिअरिंग

आर. माधवनने ‘3 इडियट्स’मध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे पडद्यावर इंजिनिअरिंग विद्यार्थी साकारणाऱ्या माधवनने खऱ्या आयुष्यातही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.

माधवनने कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने मनोरंजन क्षेत्रात आपली कारकीर्द घडवली.

सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडलं इंजिनिअरिंग?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याने दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत देशात सातवा क्रमांक मिळवल्याचं सांगितलं जातं. तसेच त्याने AIEEE परीक्षेतही चांगला रँक मिळवला होता.

सुशांतला लहानपणापासून अंतराळाबद्दल विशेष आकर्षण होतं. त्याला अंतराळवीर व्हायचं होतं, तर पर्याय म्हणून हवाई दलात पायलट होण्याचीही त्याची इच्छा होती. मात्र, कौटुंबिक कारणांमुळे त्याने इंजिनिअरिंगचा मार्ग स्वीकारला.

सुशांतने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतानाच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली. अभिनयाची आवड वाढत गेल्यानंतर त्याने इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातच शिक्षण अर्धवट सोडलं आणि मुंबई गाठली. पुढे टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंतचा त्याचा प्रवास सुरू झाला आणि त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली.

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

या कलाकारांच्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहिलं तर अभिनय आणि तंत्रज्ञानाचं क्षेत्र एकमेकांपासून पूर्णपणे वेगळं असण्याची गरज नाही, हेच दिसून येतं. कुणी इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर अभिनयाकडे वळलं, तर कुणी अभिनयाच्या स्वप्नासाठी शिक्षणाचा मार्ग मध्येच बदलला. अभियंता दिनाच्या निमित्ताने या कलाकारांचा हा वेगळा पैलू नक्कीच लक्षवेधी ठरतो.

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Web Title: Engineers day bollywood actors engineering sushant singh rajput

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • National Engineers Day

संबंधित बातम्या

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
1

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश
3

Maha Sakthi Teaser: नयनतारा साकारणार महाकालीचा रौद्र अवतार; शेवटचे 10 सेकंद ठरणार खास, ‘रामायणम्’सोबत महाक्लॅश

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य
4

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरणावर सूरज पंचोलीने सोडलं मौन; लांबलचक पोस्ट करत आदित्य ठाकरेंवरही केलं भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.