( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Maitreyaa Song: ढोल- ताशांच्या जल्लोषात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाची उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच उत्सहात भर घालण्यासाठी ‘तुझे नाव घेता’ हे बहारदार गणपती गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकर या दोघींचा खास डान्स देखील पाहायला मिळणार आहे. ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘तुझे नाव घेता’ हे गाणं समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. गणपती उत्सवाचा जल्लोष, कलाकारांचा उत्साह आणि दमदार बीट्स यामुळे गाण्याला खास फेस्टिव्ह रंग आला आहे.
या गाण्यात प्रेक्षकांना एक खास सरप्राईजही पाहायला मिळतं. दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर या दोघींची खास नृत्य अदाकारी गाण्यात पाहायला मिळणार आहे. अनेक वर्षांनंतर या दोघींना एकत्र नृत्य करताना पाहण्याची संधी मिळणार असल्याने गाण्याची रंगत आणखी वाढली आहे.
‘तुझे नाव घेता’ या गाण्याला गुरू ठाकूर यांचे शब्द लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर शिवम सिंग आणि अपूर्वा निषाद यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे.
गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि उत्सवाचा जल्लोष यांचा सुंदर मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे. आकर्षक नृत्य, दमदार संगीत आणि कलाकारांचा उत्साह यामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणात हे गाणं रंग भरणार असल्याचं दिसत आहे.
संगीतकार पंकज पडघन यांच्या मते, गाण्यात गणपती बाप्पाच्या भक्तीचा भाव आणि उत्सवाचा जल्लोष या दोन्ही गोष्टी संगीतामधून जाणवाव्यात, यासाठी पारंपरिकतेसोबत आजच्या पिढीलाही आवडेल असा उत्साहपूर्ण साउंड ठेवण्यात आला आहे.
क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर यांच्या नृत्याची खास झलक हे गाण्याचं आणखी एक आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
२३ ऑक्टोबरला ‘मैत्रेया’ होणार रिलीज
समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते असून अमन खळतकर सहनिर्माते आहेत.
चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘तुझे नाव घेता’ या गणपती गीतामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. गणपती बाप्पाचं आगमन झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे भक्तीमय आणि उत्साहपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘मैत्रेया’ येत्या २३ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या






