Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार

Bagulbua: पहिल्यांदाच खऱ्या कलाकारांसह संपूर्णतः AI द्वारे मराठीत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. बागुलबुवामध्ये अभिजीत खांडकेकरसह ५५ कलाकारांची टीम दिसणार असून असा प्रयोग करण्याची पहिलीच वेळ आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 24, 2026 | 10:21 AM
पहिल्यांदाच AI वापरून मराठी चित्रपट बागुलबुवा

पहिल्यांदाच AI वापरून मराठी चित्रपट बागुलबुवा

Follow Us
Follow Us:
  • चेतन चावडा दिग्दर्शित ‘बागुलबुवा’ मराठीतील पहिला AI चित्रपट
  • मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच खरे कलाकार घेऊन  संपूर्णतः एआयद्वारे चित्रपटाची निर्मिती
  • अभिनेता अभिजीत खांडकेकर सोबत ५५ कलाकारांची दमदार फौज
Bagulbua: आताच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) प्रभाव सर्वच क्षेत्रांवर वाढत आहे. एआयद्वारे आतापर्यंत काही चित्रपटांची निर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, असा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत झालेला नाही. ही उणीवही आता भरून निघाली असून, एआयच्या माध्यमातून पहिल्यांदाच ‘बागुलबुवा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे खरे कलाकार घेऊन एआयच्या माध्यमातून हा चित्रपट तयार करण्यात आला असून असा नाविन्यपूर्ण प्रयोग करून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट आहे.

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

५५ दमदार कलाकार, नावं गुलदस्त्यात

एस एस फिल्म्स प्रॉडक्शनने चित्रपटाची निर्मिती केली असून शरद पाटील, अंजली पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अभिनेता, दिग्दर्शक चेतन चावडा यांनी या चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केले असून नितिन चव्हाण यांनी पटकथा लेखन, विनोद राजे यांनी संकलन, अथर्व चव्हाण यांनी व्हीएफएक्स, आकाश पांडे यांनी स्टोरीबोर्ड केला आहे. मेटाफेक्स प्रोडक्शनने या चित्रपटाच्या एआयचे काम पाहिले आहे.आदिती द्रविड यांनी लिहिलेल्या गीतांना गीत साई पियूष यांचे संगीत लाभले आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर या चित्रपटात झळकणार असून अन्य ५५ दमदार कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

टायटल टीझर प्रदर्शित

‘बागुलबुवा’ या चित्रपटाचे टायटल टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून एखाद्या हॉलिवूडपटासारखा भासणारा हा टायटल टीजर आहे. चित्रपटातील कथानक पुणे आणि परिसरात घडत असल्याचं दिसतं. अचानक एक संकट येत आणि त्याच्याकडे  पाहिल्यावर डोळे बिघडतात अशी स्थिती होते. संकट म्हणून आलेला हा ‘बागुलबुवा’ म्हणजे नेमकं काय आहे याचं उत्तर चित्रपटातूनच मिळणार आहे. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा स्वरुपाचं, इतक्या भव्यतेचं चित्रण कोणत्याही टीजर, ट्रेलरमध्ये पहायला मिळालेलं नाही त्यामुळे या ‘बागुलबुवा’विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

पहिल्यांदाच AI चा वापर 

मराठी चित्रपटानं तंत्रज्ञानात झालेले बदल स्वीकारून आजवरची वाटचाल केली. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही हे तंत्रज्ञान आत्मसात करून मराठी चित्रपटाची भव्यता वाढवणे शक्य आहे. त्यासाठीच बागुलबुवा हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्णपणे एआयद्वारे निर्मिती झालेला चित्रपट या शिवाय या चित्रपटात आणखीही काही सरप्राइजेस असणार आहेत. त्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा

Title Teaser Link

Web Title: First ai marathi movie bagulbua abhijeet khandkekar in lead dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • ai
  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
1

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप
3

IITian Pranita Pujari Apple Job: ॲपलला राम राम ठोकला! मायग्रेनच्या त्रासाला कंटाळून तरुणीने सुरू केला ‘हा’ नवा स्टार्टअप

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?
4

IndiaAI Fellowship 2026: विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! केंद्र सरकार देणार लाखो रुपयांची फेलोशिप; अर्ज कसा करावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.