Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: सततच्या चर्चांवर गोविंदांचा पलटवार; ‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू…’

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: गोविंदा आणि मराठी अभिनेत्री कोमल रानी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. दोघे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र गेल्याने या चर्चांना आणखी उधाण आले. यानंतर गोविंदाने या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 26, 2026 | 10:57 AM
Govinda on After Lalbaugcha Raja Visit: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Govinda on After Lalbaugcha Raja Visit: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गोविंदा आणि कोमल रानी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.
  • ‘रुपा’ सिनेमाच्या यशासाठी गोविंदा लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला.
  • कोमल रानी ‘रुपा’ सिनेमात गोविंदासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
बॉलिवूडचा हिरो नंबर 1 गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा त्याच्या खाजगी आयु्ष्यामुळे चर्चेचा विषय ठरला. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि एक मराठी अभिनेत्री कोमल रानी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाचा नुकतेच दोघांनी एकत्र लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचे व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झाले आणि चर्चेंना उधाण आले. नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया म्हणाले की, गोविंदाचं सुनीता सोबतचं लग्न मोडणार का? गोविंदा कोमलला डेट करतोय का? सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या. आता या सर्व चर्चांवर स्वतः गोविंदाने अखेर मौन सोडलं आणि नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. Govinda on After Lalbaugcha Raja Visit:

 

गोविंदाने सांगितलं कारण?

गोविंदाने ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, तो लालबागच्या राजाच्या दर्शनाला का गेला होता. तो म्हणाला मी तिथे माझ्या नवीन सिनेमासाठी गेलो होतो. माझा ‘रुपा’ नावाचा सिनेमा येतोय. बऱ्याच वर्षानंतर मी परत सिनेमात ऍक्टिव्ह होतोय, त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. सिनेमा हिट होऊ दे म्हणून प्रार्थना करायला गेलो होतो.यावेळी त्याने त्याच्या जुन्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला,

यावेळी गोंविदा म्हणाला की, “आधी मी करिश्मा कपूर सोबत पण मंदिरात दर्शनाला गेलो होतो, तेव्हा आमच्या सिनेमाला यश मिळालं होतं. रवीना टंडन सोबत पण मी मंदिरात गेलो होतो. हा माझा जुना नियम आहे, नवीन सिनेमा आला की मी देवाचं दर्शन घेतो. त्यामुळे यावेळी पण रुपा सिनेमाच्या यशासाठी आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.”

#WATCH | Mumbai | On reports on him participating in a reality show, Actor Govinda says, “Nothing has been decided yet. Talks are underway. I might do a show in the future, but nothing is confirmed right now… I don’t watch many reality shows. If I find something interesting, I… pic.twitter.com/shQ7TKKvtk — ANI (@ANI) September 24, 2026

कोमल रानी कोण ?

कोमल रानी स्वर्णकार ही मराठी आणि हिंदी सिनेमात काम करते. गोविंदाच्या ‘रुपा’ सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे दोघे एकत्र दर्शनाला गेले होते. पण नेटकऱ्यांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. गोविंदा आणि कोमल एकत्र दिसले, हसून बोलत होते, त्याचे व्हिडिओ आले आणि लोकांनी लगेच अफेअरचा शिक्का मारला.

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

खाजगी आयुष्याच्या चर्चांवर गोविंदा म्हणाला की,

“माझं खाजगी आयुष्य खाजगीच राहू द्या या सगळ्या अफवांवर गोविंदा थोडा नाराज झाला आहे. तो म्हणाला की, कोमल सोबत माझं नातं फक्त कामापुरतं आहे. ते एक व्यावसायिक नातं आहे. ती माझ्या सिनेमाची हिरोईन आहे, आम्ही एकत्र काम करतोय. यापेक्षा जास्त काही नाही. माझ्या खाजगी आयुष्याला तुम्ही असं चर्चेचा विषय बनवू नका. माझं लक्ष आता फक्त माझ्या कामावर आहे. मी परत सिनेमात येतोय, मला माझ्या कामावर फोकस करायचं आहे. अशा खोट्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होतो.”

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’

गोविंदाने स्पष्ट केलं आहे की त्यांच्या नात्यांमध्ये सगळं ठीक आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. खरं तर गोविंदा गेल्या काही वर्षांपासून सिनेमापासून लांब होता. आता तो ‘रुपा’ सिनेमातून कमबॅक करतोय. त्याला वाटतंय की लोकांनी त्याच्या कामाबद्दल बोलावं, त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल नाही. बाप्पाच्या दर्शनाला जाणं ही त्याची श्रद्धा आहे, त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं त्याने सांगितलं आहे.

Web Title: Govinda komal rani swarkar affair rumours rupa movie lalbaugcha raja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Govinda
  • Lalbaghcha Raja
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
1

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन
2

Govinda On Rani Swarnakar: ‘माझ्याविरोधात प्लॅन आखला जातोय…’; राणी स्वर्णकारसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर गोविंदाने सोडलं मौन

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
3

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा
4

Bappa Majha Song: भक्ती, उत्सव अन् सामाजिक संदेशाची सांगड; ‘बाप्पा माझा’ गाण्याने चार दिवसांत गाठला 1 मिलियनचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.