Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda-Sunita Ahuja Divorce: गोविंदा-सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार? मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता; Video व्हायरल

Govinda-Sunita Ahuja Divorce: सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात पोहोचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गोविंदा-सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 03:20 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Govinda-Sunita Ahuja Divorce: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आहेत. गोविंदाचे अभिनेत्री राणी स्वर्णकरसोबतचे विमानतळावरील व्हिडिओ आणि त्यानंतर सुनीता आहुजाने केलेल्या वक्तव्यांमुळे दोघांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते. आता सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गोविंदा-सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे.

मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता

बुधवारी सकाळी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात पोहोचली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती कोर्टातून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी सुनीता नेहमीप्रमाणे माध्यमांशी संवाद साधताना दिसली नाही. ती गंभीर आणि घाईत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

यशवर्धननेही पापाराझींना फोटो न काढण्याची विनंती केली. गाडीत बसताना सुनीताने मात्र उपरोधिक अंदाजात, “आम्ही तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलो होतो,” असे म्हटल्याचे दिसत आहे.

२०२४ मध्ये दाखल केला होता घटस्फोटाचा अर्ज?

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा यापूर्वीही समोर आल्या होत्या. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, सुनीताने ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, असे वृत्त समोर आले होते.

हे प्रकरण काही महिन्यांनंतर सार्वजनिक झाले. फेब्रुवारी २०२५ मध्ये गोविंदाचे वकील आणि कौटुंबिक मित्र ललित बिंदल यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल झाल्याचे मान्य केले होते. मात्र, त्यावेळी त्यांनी हे जोडपे पुन्हा एकत्र असल्याचे सांगत त्यांच्यातील नातं संपणार नसल्याचा दावा केला होता.

यानंतरही गोविंदाच्या वकिलांनी दोघे लवकरच विभक्त होणार असल्याच्या वृत्तांचे खंडन केले होते. सुनीता आहुजानेही एका मुलाखतीत आपण गोविंदाला कधीही सोडणार नसल्याचे म्हटले होते.

एखाद्यावर प्रेम करता तेव्हा अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. गोविंदाचे आयुष्यात किती अफेअर्स होते, याचा विचार आपण करत नाही, असेही तिने म्हटले होते.

Mahakavya Shri Ramayan Katha Teaser: ‘कच्चा बदाम गर्ल’ बनली सीता; टीझरवर नेटकऱ्यांचा संताप; ‘ही’ मोठी चूक आली समोर

राणी स्वर्णकरसोबतच्या व्हिडिओमुळे वाद

काही दिवसांपूर्वी गोविंदा त्याच्या आगामी ‘रूपा’ चित्रपटातील अभिनेत्री राणी स्वर्णकरसोबत विमानतळावर दिसला होता. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, गोविंदा किंवा राणीने त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

या प्रकरणावर सुनीता आहुजाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. तिने गोविंदासोबत दिसणाऱ्या तरुण अभिनेत्रीच्या वयावरूनही टिप्पणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाला आणखी हवा मिळाली.

गोविंदानेही दिलं होतं उत्तर

सुनीताच्या वक्तव्यांनंतर गोविंदानेही एका व्हिडिओ संदेशातून प्रतिक्रिया दिली होती. सुनीता आपल्या व्यावसायिक कामात हस्तक्षेप करत असल्याची नाराजी त्याने व्यक्त केली होती. तसेच, चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नव्या कलाकारांना अपमानित करून किंवा त्यांना घाबरवून इंडस्ट्रीपासून दूर करण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्याने म्हटले होते.

सुनीताने गोविंदाच्या वयावर केलेल्या टीकेलाही अभिनेत्याने उत्तर दिले होते. आपल्या वयापेक्षा लहान अभिनेत्रींसोबत काम करणारे अनेक आघाडीचे अभिनेते इंडस्ट्रीमध्ये असल्याचे त्याने म्हटले होते.

Lagna Ani Barach Kahi: ‘लग्न आणि बरंच काही’चा नवा अंदाज; सुनेत्रा पवारांच्या हस्ते पोस्टर अनावरण

मग गोविंदा-सुनीता यांचा घटस्फोट होणार का?

सुनीता आहुजा फॅमिली कोर्टात पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, सध्या सुनीता कोर्टात नेमक्या कोणत्या कारणासाठी गेल्या होत्या किंवा गोविंदा-सुनीता यांचा घटस्फोट निश्चित झाला आहे, याबाबत दोघांकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे केवळ या व्हिडिओच्या आधारे घटस्फोट निश्चित झाल्याचे म्हणणे घाईचे ठरेल. आता या प्रकरणात गोविंदा किंवा सुनीता आहुजा यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण कधी येते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Govinda sunita ahuja divorce family court yashvardhan video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Divorce
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Food Divorce म्हणजे नेमकं काय? आवडत्या पदार्थांपासून दूर जाण्याचा वाढत आहे अनोखा ट्रेंड
1

Food Divorce म्हणजे नेमकं काय? आवडत्या पदार्थांपासून दूर जाण्याचा वाढत आहे अनोखा ट्रेंड

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल
2

Govinda-Sunita: गोविंदा-सुनीता वादाच्या चर्चेत सुनेची ‘ती’ पोस्ट! प्रेमावरचा विश्वास डळमळला? एका वाक्याने वाढवल

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…
3

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला
4

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.