
फोटो सौजन्य - Social Media
बुधवारी सकाळी दिव्यांकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मेहनतीच्या जोरावर हरियाणवी मनोरंजन क्षेत्रात मोठे नाव कमावणारी अभिनेत्री मूळची Bulandshahr येथून येते. तिने अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम केले असून विशेषतः गायक Masoom Sharma यांच्यासोबतची तिची कामे गाजली होती. विविध संगीत व्हिडिओंमध्ये तिची उपस्थिती प्रेक्षकांना भावली होती.
१९ नोव्हेंबर १९९६ रोजी जन्मलेल्या दिव्यांकाने शिक्षणातही उल्लेखनीय कामगिरी केली होती. तिने मेरठ येथील Chaudhary Charan Singh University मधून बीसीए पदवी पूर्ण केली. त्यानंतर सिक्कीममधून एमबीए पदवी मिळवली. तिच्या पश्चात भाऊ हिमांशू आणि बहिणी दिपांशू व जस्मीत असा परिवार आहे. निधनाच्या वेळी ती कुटुंबासोबत गाझियाबादमध्ये राहत होती.
अभिनेत्री सोशल मीडियावरही फार सक्रिय होती. दिवाळीच्या सुमारास Meri Mammi Nu Pasand Ni Tu या गाण्यावर तिने तयार केलेली Reel ने कोटींमध्ये Views मिळवले होते. सोशल मीडियावर तिची चाहतेमंडळी अफाट होती. अभिनेत्रीच्या निधनाने देशभरातील सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. दिव्यांका सिरोहीने 50 पेक्षा अधिक गाण्यांमध्ये काम केले होते. अभिनेत्रीचे तारुण्यात झालेले निधन हे हरियाणवी मनोरंजन क्षेत्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. तिच्या जाण्याने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून तिच्या आठवणी कायम जिवंत राहतील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.