(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
अमेझॉन प्राईमवर नुकतीच प्रदर्शित झालेली आणि जगभरात चर्चेत आलेली ‘मटका किंग’ ही वेब सीरिज सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. Vijay Varma आणि Sai Tamhankar यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, तिचे कौतुक देश-विदेशात होत आहे.
या सीरिजची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ग्लोबल स्टार Priyanka Chopra हिलाही ‘मटका किंग’ची भुरळ पडली आहे. प्रियांकाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरी शेअर करत या सीरिजच्या संपूर्ण टीमचे तोंडभरून कौतुक केले आहे.
तिच्या या प्रतिक्रियेमुळे ‘मटका किंग’बद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, प्रेक्षकांमध्येही या सीरिजची चर्चा रंगताना दिसत आहे. उत्कृष्ट कथानक, दमदार अभिनय आणि आकर्षक मांडणीमुळे ‘मटका किंग’ सध्या वेब विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे.
‘मटका किंग’ या गाजत असलेल्या वेब सीरिजमध्ये Sai Tamhankar हिने ‘बरखा’ ही व्यक्तिरेखा साकारली असून, तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या भूमिकेतील प्रभावीपणा आणि नैसर्गिक सादरीकरणामुळे प्रेक्षकांकडून तिला भरभरून दाद मिळताना दिसत आहे.
आजवर अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलेल्या सईसाठी हा टप्पा आणखी खास ठरतो, कारण ग्लोबल स्टार Priyanka Chopra हिच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप ही नक्कीच मोठी दखल मानली जात आहे. प्रियांकाच्या या प्रतिक्रियेमुळे सईच्या कामाची चर्चा आणखी रंगली असून, तिच्या अभिनय प्रवासाला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
Veen Doghatli Hi Tutena : स्वानंदी-समरचा वृक्षारोपण उपक्रम ठरतोय खास; नात्यात वाढणार नवी जवळीक
या मालिकेचे लेखन आणि निर्मिती अभय कोरणे यांनी केली आहे, तर नागराज पोपट्राव मंजुळे यांनी ती निर्माण, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मुख्य भूमिकांमध्ये विजय वर्मा, कृतिका कामरा, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जडावत आणि गुलशन ग्रोवर दिसतात. यांच्यासोबत विनीत कुमार सिंह, भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस सहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोतांगिया आणि सिमरन अश्विनी हेही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकतात.
सिद्धार्थ रॉय कपूर, नागराज मंजुळे, गर्गी कुलकर्णी, अश्विनी सिडवानी आणि आशीष आर्यन यांनी निर्मिती केलेली ही मालिका रॉय कपूर फिल्म्स, आटपट आणि एसएमआर एंटरटेनमेंट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आली असून आता ती भारतासह २४० हून अधिक देशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे.
‘मटका किंग’ ही बहुप्रतीक्षित मालिका १७ एप्रिलपासून भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये प्रदर्शित झाली असून, या मालिकेमुळे प्रेक्षकांना एक वेगळा आणि थरारक अनुभव मिळणार आहे. तसेच ‘मटका किंग’ ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.






