Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hoor Coke Studio : ‘हूर’ मधून कोक स्टुडिओ भारतने घडवली काश्मीरच्या लोकसंगीताची सुरेल सफर

भारतातील लोकसंगीत आणि प्रादेशिक सांगीतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कोक स्टुडिओ भारतच्या चौथ्या सीझनमधील चौथे गाणे 'हूर' प्रदर्शित झाले आहे. काश्मीरच्या शतकानुशतके जुन्या मौखिक कथाकथन परंपरेवर आधारित या गाण्यात प्रेम, विरह आणि भक्तीची कथा आधुनिक संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2026 | 02:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील लोकसंगीत आणि प्रादेशिक सांगीतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या कोक स्टुडिओ भारतच्या चौथ्या सीझनमध्ये आता काश्मीरच्या सांगीतिक वारशाची झलक पाहायला मिळत आहे. या सीझनमधील चौथे गाणे ‘हूर’ प्रदर्शित झाले असून, काश्मीरच्या शतकानुशतके जुन्या कथाकथन परंपरेवर आधारित ही लोककथा आधुनिक संगीताच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे.

Navi Mumbai News : नेरुळ करंट प्रकरणाला राजकीय वळण; मनसेची महापालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘हूर’ या गाण्याची प्रेरणा काश्मीरमधील मौखिक कथाकथन परंपरेतून घेतली आहे. पूर्वी गायक-संगीतकार मैफिलींमध्ये एकत्र येऊन राजे, प्रेमीयुगुल, भटके आणि गूढ कथांचे गायन करत असत. त्याच परंपरेला आधुनिक संगीताची जोड देत हे गाणे तयार करण्यात आले आहे. ‘शेख’ आणि ‘हूर’ या दोन पात्रांच्या प्रवासातून प्रेम, विरह आणि भक्तीच्या भावना उलगडत जातात. विविध आवाजांचे स्तर, पारंपरिक वाद्ये आणि रॉक संगीताचा संगम या गाण्याला वेगळी ओळख देतो. हे गाणे गायक-गीतकार फहीम अब्दुल्ला, संगीतकार व गायक अर्सलान निजामी आणि उस्ताद कैसर निजामी यांनी साकारले आहे. काश्मीरी लोककथांच्या शैलीत पुढे सरकणारे हे गाणे ऐकताना जिवंत मैफिलीत बसल्याचा अनुभव देते. विशेष म्हणजे, गाण्याचा शेवट काश्मीरी काव्यपंक्तीने होत असल्याने श्रोत्यांना त्या संस्कृतीशी अधिक जवळीक वाटते.

कोका-कोला इंडिया आणि साऊथवेस्ट एशियाचे आयएमएक्स लीड शंतनू गांगणे यांनी सांगितले की, भारतातील प्रत्येक प्रदेशात वेगळ्या कथा आणि सांस्कृतिक वारसा दडलेला आहे. ‘हूर’च्या माध्यमातून काश्मीरच्या या समृद्ध परंपरेला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, कलाकारांनी मूळ भाव कायम ठेवत गाण्याला जागतिक दर्जाची मांडणी दिली आहे.

फहीम अब्दुल्ला यांच्या मते, ‘हूर’ ही पिढ्यानपिढ्या जपली गेलेली कथा असून, कोक स्टुडिओ भारतमुळे ती अधिक मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. तर अर्सलान निजामी यांनी काश्मीरी लोकसंगीतातील कथाकथनाची शैली हीच या गाण्याची खरी ताकद असल्याचे सांगितले. उस्ताद कैसर निजामी यांनीही मोठ्या मंचावर सादर करताना गाण्यातील आत्मीयता जपण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले.

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

‘ऐ अजनबी’, ‘बुल्लेया वे’ आणि ‘कचौडी गली’नंतर ‘हूर’ने कोक स्टुडिओ भारतच्या चौथ्या सीझनमध्ये आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण लोकसांगीतिक परंपरेची भर घातली आहे. काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक संगीताच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे हे गाणे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे.

Web Title: Hoor new song that represents culture of whole kashmir coke studio india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • jammu kashmir

संबंधित बातम्या

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल
1

भारताच्या या गावाला का म्हटलं जातं सायलंट व्हिलेज, कारण जाणून तुम्हीही व्हाल इमोशनल

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
2

Breaking: अचानक हादरली जमीन अन् नागरिकांची उडाली धावपळ; जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा
3

Jammu Kashmir हादरले! गुलमर्गमध्ये भीषण स्फोट; 1 व्यक्ती ठार तर 4 जण जखमी, सुरक्षा यंत्रणेचा वेढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.