Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार

‘If Wishes Could Kill’ ही नेटफ्लिक्सवरील 8 भागांची हॉरर-थ्रिलर सीरिज आहे. रहस्यमय मोबाईल ॲप, 5 मित्र आणि भयानक ट्विस्टने भरलेली ही सीरिज पाहताना उडेल थरकाप.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 09:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

जर तुम्हाला हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या कथा पाहायला आवडत असतील, तर नेटफ्लिक्सवरील ‘If Wishes Could Kill’ ही ८ भागांची सीरिज तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. मालिकेतील प्रत्येक भागात भीती आणि रहस्याचा डोस पाहायला मिळतो. त्यामुळे ही सीरिज एकट्याने पाहण्याचे धाडस करण्यापूर्वी नक्कीच विचार करा.

पाच मित्र आणि रहस्यमय मोबाईल ॲप

‘If Wishes Could Kill’ची कथा पाच शाळकरी मित्रांभोवती फिरते. सुरुवातीला त्यांचं आयुष्य अगदी सामान्य असतं. मात्र, अचानक त्यांच्या आयुष्यात एका अशा मोबाईल ॲपची एंट्री होते, जे कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतं.

सुरुवातीला या ॲपमुळे मित्रांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचं वाटतं. मात्र, या इच्छांची किंमत त्यांना चुकवावी लागते. ॲपवर इच्छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला अखेरीस आपला जीव गमवावा लागतो.

Kriti Sanon: ‘संस्कृती कपड्यांत नाही..’; रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून ट्रोल झाल्यानंतर कृती सेननचं सडेतोड उत्तर

ॲपच्या मागचं रहस्य अधिक भयानक

कथा जसजशी पुढे जाते, तसतसे हे पाचही मित्र या रहस्यमय ॲपच्या जाळ्यात अडकत जातात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि ॲपच्या निर्मात्यांमागचं गूढ उलगडण्याचा प्रयत्न सुरू होतो.

दरम्यान, या ॲपमागचं सत्य समोर येत असताना कथेत अनेक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळतात. हॉररसोबतच थ्रिलर आणि सस्पेन्सचा तडका असल्याने प्रत्येक भागानंतर पुढे काय होणार, याची उत्सुकता कायम राहते.

क्लायमॅक्समध्ये उलगडणार सगळी रहस्यं

मालिकेच्या शेवटच्या भागात कथेशी संबंधित अनेक रहस्यं उलगडतात. क्लायमॅक्समध्येही प्रेक्षकांना उत्कंठावर्धक आणि भयावह अनुभव मिळतो. त्यामुळे शेवटपर्यंत ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

‘If Wishes Could Kill’ ही मालिका २४ एप्रिल २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्याचं सांगितलं जात आहे. ८ भागांची ही सीरिज वीकेंडला बिंज-वॉच करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

Himanshi Khurana On Asim Riyaz: धर्मांतराच्या वादावरून असीम-हिमांशी आमनेसामने, ‘CCTV, रेकॉर्डिंग’चा उल्लेख करत अभिनेत्रीचा पलटवार

IMDb वर मिळालं चांगलं रेटिंग

‘If Wishes Could Kill’ला IMDb वर ७ रेटिंग मिळाल्याचा दावा केला जात आहे. कथानकासोबतच मालिकेतील कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हॉरर आणि सस्पेन्सचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांनी ही सीरिज आपल्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच ठेवू शकता.

Web Title: If wishes could kill netflix 8 episode horror series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • horror story
  • Web Series

संबंधित बातम्या

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर
1

Char Yaar Web Series: सई ताम्हणकर ते चंकी पांडे; ‘चार यार’मध्ये झळकणार दिग्गज कलाकार, रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.