Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Ishqa Ishqa Trailer: प्राइम व्हीडिओच्या आगामी एमएक्स ओरिजिनल ‘इश्का इश्का’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेम, वेड, नियंत्रण आणि स्वातंत्र्य यांच्यातील धूसर होत जाणाऱ्या सीमांवर आधारित या रोमँटिक थ्रिलरमध्ये हेली शाह, सत्यजीत दुबे आणि अनुष्का कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 05, 2026 | 05:44 PM
Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘इश्का इश्का’चा ट्रेलर रिलीज
  • कबीर दोन वेगळ्या प्रेमभावनांमध्ये अडकतो
  • 7 ऑक्टोबर 2026 पासून स्ट्रीमिंग
 

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी भारतातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सेवा असलेल्या प्राइम व्हीडिओ’च्या वतीने आज आगामी एमएक्स ओरिजिनल इश्का इश्काच्या ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला. हा प्रेम, वेड आणि नियंत्रण यांच्यातील अस्पष्ट रेषांचा शोध घेणारा एक तीव्र रोमँटिक थ्रिलर आहे.

राजेश बच्चन लिखित आणि अमित कुमार झा दिग्दर्शित या मालिकेत हेली शाह, सत्यजीत दुबे आणि अनुष्का कौशिक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मूव्हिंग इमेजेस स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असून ही सिरिज कबीर या उदयोन्मुख लेखकाभोवती फिरते. ही व्यक्तिरेखा प्रेमाच्या दोन अतिशय भिन्न प्रकारांमध्ये अडकली आहे. त्याला शांती देणारा एकप्रकार आणि एक गोंधळाला उत्तेजन देणारी स्थिती!

तीन जीवनाची ओळख

ट्रेलरमध्ये आरोही (हेली शाहने साकारलेली भूमिका), कबीर (सत्यजीत दुबेने साकारलेली भूमिका) आणि सुहानी (अनुष्का कौशिकने साकारलेली भूमिका) या वाढत्या गुंतागुंतीच्या भावनिक संघर्षात अडकलेल्या तीन जीवनाची ओळख करून दिली आहे. आरोहीसाठी, प्रेम म्हणजे कबीर पूर्णपणे तिचा असणे, अंतर, शंका किंवा निवडीसाठी फारच कमी वाव. Ishqa Ishqa Trailer:

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

दरम्यान, कबीरला सुहानीत असं काही निदर्शनास येते ज्याचा शोध तो बऱ्याच काळापासून घेत होताः स्थिरता, विश्वास आणि भावनिक स्पष्टता. आरोहीचे पुनरागमन त्याला परत त्या तीव्रतेकडे खेचण्याची धमकी देते ज्याने त्याचे नाते आणि लेखक म्हणून असलेल्या ओळखीला नेहमीच चालना दिली आहे. या दोन स्त्रिया कबीरच्या आयुष्यातील दोन विरोधी शक्तींचे प्रतिनिधित्व करतात. कबीर स्वतःला गोंधळ आणि शांतता, ताबा तसेच स्वातंत्र्याला प्रेरणा देणारे प्रेम अन् त्याविरुद्ध त्याचा बचाव करणारे प्रेम या दरम्यान अडकलेला पाहतो. द डेअर नियम करताना, भावना एका मानसिक खेळात परावर्तित होताना, इश्का इश्का एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतेः प्रेम मर्यादा ओलांडून एक अस्वस्थ वेड बनते?

दमदार अभिनयन

या मालिकेबद्दल बोलताना, प्राइम व्हिडिओ इंडियाचे एव्हीओडी कंटेंटचे डायरेक्टर आणि हेड अमोघ दुसाद म्हणाले, “इश्का इश्का’ प्रेम आणि भावनेभोवती फिरते. वेड, नियंत्रण आणि सोडून देण्याच्या भीतीशी गुंफलेली स्थिती नेमकी काय असते याचा शोध घेते. या मालिकेच्या मुळाशी एक रंजक भावनिक वेग आहे. ज्यात सतत गोंधळ आणि शांतता, तीव्रता आणि स्थिरतेमध्ये पात्रे ओढली जातात. अमित कुमार झा यांची दूरदृष्टी आणि हेली शाह, सत्यजीत दुबे आणि अनुष्का कौशिक यांच्या दमदार अभिनयाने आम्ही ही उत्कट आणि अनपेक्षित कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी उत्सुक आहोत.”

आरोहीच्या भूमिकेबद्दल बोलताना हेली शाह म्हणाली, “आरोही कबीरवर अत्यंत तीव्रतेने प्रेम करते. परंतु तिच्यासाठी प्रेम आणि ताबा ही जवळजवळ एकच गोष्ट आहे. ती झपाटून प्रेम करते म्हणूनच नव्हे तर तिचा अर्धवट भावनेवर विश्वास नसतो; या गोष्टीने मी या भूमिकेकडे आकर्षित झाले. ती बुद्धिमान, धोरणात्मक आणि खोलवर भावनिक आहे. ज्यामुळे व्यक्तिरेखा अनपेक्षित बनते. हे पात्र असुरक्षित आहे. परंतु तिची एक बाजू देखील आहे जी धोकादायक असू शकते. त्या दोन्ही बाजू सांभाळू शकणाऱ्या व्यक्तिची भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक आणि रंजक होते.”

कोणताही सोपा मार्ग दिसत नाही

कबीरबद्दल बोलताना सत्यजीत दुबे म्हणाला, “कबीर हा एक संवेदनशील व्यक्ती आहे. तो स्वतःला अशा परिस्थितीत अडकवतो ज्यातून सुटणे अधिकाधिक कठीण होत जाते. सुहानी त्याच्या जीवनात शांतता आणि भावनिक स्पष्टता आणत असताना, आरोहीच्या तीव्र उपस्थितीमुळे खरोखर पुढे जाणे कठीण होत जाते. कबीर बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासह स्वतःसाठी एक वेगळे जीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना, तो परत अशा परिस्थितीत ओढला जात राहतो ज्याची त्याने कल्पनाही केली नव्हती. ज्यातून बाहेर पडण्याचा कोणताही सोपा मार्ग दिसत नाही, अशा परिस्थितीतून मार्ग शोधण्याबद्दलचा त्याचा प्रवास आहे.”

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

सुहानीची भूमिका साकारण्याचा आपला अनुभव सांगताना अनुष्का कौशिक पुढे म्हणाली, “सुहानीचे पाय जमिनीवर आहेत. भावनिकदृष्ट्या जागरूक आहे आणि तिला नात्यातून काय हवे आहे याची स्पष्ट समज आहे. प्रेमात विश्वासासकट मोकळेपणा असला पाहिजे. यामुळेच मला या भूमिकेला आकार देता आला. त्याच वेळी, या व्यक्तिरेखेत शांत शक्ती आहे जी कथा पुढे सरकत असताना अधिक स्पष्ट होते. सुहानीची भूमिका साकारणे म्हणजे भावना आणि नातेसंबंधांना चालना देणे. नेहमी वाटते तितके सोपे काम नाही आणि त्यामुळे हे पात्र साकारताना खूप समाधान मिळाले.”

सुहानीची स्थिर भावना

प्रेम इच्छेचे रूपांतर लढाईत होत असताना, प्रेम, ओळख आणि नियंत्रण अविभाज्य होते. त्यावेळी काय होते याचा शोध घेण्यासाठी इश्का इश्का पारंपरिक प्रेम-त्रिकोणाच्या पलीकडे जाते. आरोहीची तीव्रता आणि सुहानीची स्थिर भावना यांच्यात कबीर भरडून निघतो. प्रत्येक निवडीचा एक परिणाम असतो. प्रेम करणे आणि वश होणे यामधील रेषा धूसर होऊ लागते.

एमएक्स ओरिजिनल इश्का इश्का दिनांक 7 ऑक्टोबर 2026 पासून प्राइम व्हिडिओवर आणि एमएक्स प्लेयर अँड्रॉइड अॅपवर स्ट्रीम होईल. ही सिरीज प्राइम व्हिडिओद्वारे एमएक्स प्लेयर, भारतातील आघाडीची विनामूल्य, प्रीमियम, जाहिरात-समर्थित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा, मोबाइल डिव्हाइसेस, कनेक्टेड टीव्ही, अमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ आणि फायर टीव्हीवर उपलब्ध आहे.

Web Title: Ishqa ishqa trailer helly shah satyajeet dubey anushka kaushik rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
1

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
3

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन
4

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.