Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kamal Haasan: “संकट काळात राजकारण नको, देश प्रथम क्रमांकावर हवा”; कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन!

अभिनेता आणि राजकारणी कमल हासन यांनी जागतिक ऊर्जा संकट आणि इंधन दरवाढीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी माजी पंतप्रधान अटलजी आणि शास्त्रीजींचा दाखला देत देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 07:29 PM
कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन! (Photo Credit- X)

कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “संकट काळात राजकारण नको
  • देश प्रथम क्रमांकावर हवा”
  • कमल हासन यांचे देशवासीयांना भावुक आवाहन!
Kamal Haasan Fuel Crisis Statement: गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेतील (पश्चिम आशिया) वाढता तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक ऊर्जा संकट या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम (MNM) पक्षाचे अध्यक्ष कमल हासन (Kamal Haasan) यांनी देशवासीयांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. कमल हासन यांनी आपल्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “सध्याची जागतिक परिस्थिती केवळ आर्थिक आव्हान नसून, संपूर्ण देशाने एकत्र येऊन आपली राष्ट्रीय जबाबदारी ओळखण्याची ही वेळ आहे,” असे ते म्हणाले. कमल हासन यांनी सर्व नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि राष्ट्रीय हित हे राजकारणापेक्षा नेहमी वर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक तणावाचा भारतावर थेट परिणाम

आपल्या व्हिडिओमध्ये कमल हासन यांनी बदलत्या जागतिक समीकरणांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “इराण युद्धाची परिस्थिती आणि सागरी व्यापारी मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा खनिज तेल आणि गॅस आयात करत असल्याने, याचा थेट फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. घरगुती एलपीजी (LPG), पेट्रोल-डीझेल, खते आणि उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल सातत्याने महाग होत चालला आहे.”

India has overcome wars, shortages, and global crises before – through unity and shared sacrifice. This moment calls for the same national spirit again. 🇮🇳 pic.twitter.com/Mi56m0I4pD — Kamal Haasan (@ikamalhaasan) May 22, 2026

या गंभीर परिस्थितीत जगातील अनेक देशांनी आधीच ‘एनर्जी-एजिंग’ (Energy-Saving Regulations) सारखे कडक नियम लागू केले आहेत. सिंगापूरसारख्या प्रगत देशांचे नेतेही आपल्या नागरिकांना आगामी कठीण काळासाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्याचा सल्ला देत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या आवाहनाचा उल्लेख केला, ज्यामध्ये पंतप्रधानांनी देशवासीयांना पुढील एक वर्ष वीज आणि इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले होते.

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

वाजपेयी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या आठवणींना दिला उजाळा

राजकीय मतभेदांपेक्षा देशाचे हित मोठे असल्याचे सांगताना कमल हासन यांनी माजी पंतप्रधानांचे दाखले दिले. ते म्हणाले, “संकट काळात देशाप्रती असलेली जबाबदारी कोणत्याही राजकीय मतभेदापेक्षा मोठी असली पाहिजे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत म्हटले होते की, ‘सरकारें आएंगी-जाएंगी, पार्टियां बनेंगी-बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए.’ तसेच, १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान देशातील नागरिकांनी आपल्या घरातील सोने देशासाठी दान केले होते. १९६५ च्या अन्नधान्य संकटाच्या वेळी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशवासीयांना आठवड्यातून एक वेळचे जेवण सोडण्याचे आवाहन केले होते आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिला होता.” ते पुढे म्हणाले, “आजच्या घडीला देशाला तेवढ्या मोठ्या त्यागाची गरज नाही. मात्र, छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या पार पाडूनही नागरिक मोठे योगदान देऊ शकतात. आपल्या जुन्या पिढ्यांनी देशासाठी इतके मोठे त्याग केले, मग आज आपण वीज आणि इंधन वाचवण्यासारखा छोटा प्रयत्न करू शकत नाही का?”

केंद्र सरकारच्या ऊर्जा धोरणांचे कौतुक

या व्हिडिओमध्ये कमल हासन यांनी केंद्र सरकारच्या काही सकारात्मक धोरणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत भारताने सौर ऊर्जा (Solar Energy) आणि पवन ऊर्जा (Wind Energy) क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कोळसा गॅसिफिकेशन (Coal Gasification), रिन्युएबल एनर्जी आणि अणुऊर्जेतील वाढती गुंतवणूक हे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले सकारात्मक पाऊल आहे. परदेशी तेल आणि गॅसवरील अवलंबित्व कमी करणे ही भारताच्या आर्थिक स्वावलंबित्वासाठी काळाची गरज बनली आहे.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांना विशेष विनंती

केवळ सामान्य जनतेकडूनच त्यागाची अपेक्षा केली जाऊ नये, असे स्पष्ट करत कमल हासन यांनी प्रशासनालाही काही सल्ले दिले. ते म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, त्यांनी तातडीने सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक राष्ट्रीय बैठक बोलवावी. केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे पेट्रोल आणि डिझेलवरील कर (Taxes) कमी केले पाहिजेत. तसेच बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट दर घटवले पाहिजेत, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (Public Transport) वापर करतील. आज वाचवलेला प्रत्येक लीटर इंधनाचा थेंब आणि विजेचे प्रत्येक युनिट भविष्यातील भारताला अधिक मजबूत करेल.”

आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, “भारताने यापूर्वीही राष्ट्रीय एकता आणि सामूहिक त्यागाच्या जोरावर अनेक युद्धे, टंचाई आणि जागतिक संकटांवर मात केली आहे. आज पुन्हा एकदा त्याच राष्ट्रीय भावनेची देशाला गरज आहे.” जर आपण एकजुटीने या संकटाचा सामना केला, तर भारत या कठीण काळातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कलन हसन यांनी लगावली डोनाल्ड ट्रम्पला शाब्दिक चपराक; राष्ट्राभिमान नेहमीच सर्वोतोपरी

Web Title: Kamal haasan urges citizens to save fuel and electricity amid global energy crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Fuel Price Hike
  • Kamal Haasan
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
1

‘2029 मध्ये मोदी पंतप्रधान नसतील; सत्ताबदल त्यांच्या कारभारामुळेच..,’ पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड
2

Dimagi Naxal Party Instagram Trend: पंतप्रधान मोदींच्या ‘दिमागी नक्षल’ विधानाचे सोशल मीडियावर बुमरँग; ‘दिमागी नक्षल पार्टी’ ट्रेंड

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
3

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?
4

मुख्यमंत्री फडणवीसांची प्रधानमंत्री मोदींसोबत भेट; महाराष्ट्रातील प्रलंबित प्रकल्पांसाठी नेमकी काय झाली चर्चा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.