फोटो सौजन्य - Social Media
काय म्हणाले Veteran Actor Kamal Haasan?
दिग्गज अभिनेते कमल हसन यांनी खुले पत्र त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी या कठीण काळात सिनेसृष्टी उत्तमरित्या चालण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे नमूद केले आहेत, तसेच या मुद्द्यांना देशातील सगळेच Filmmakers समजून घेऊन त्या गोष्टी मनावर घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे.
अभिनेते कमल हासन म्हणतात की, “पश्चिम आशियातील देशांमध्ये युद्धाचे वातावरण आहे. याचा प्रभाव देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असून जगभरात इंधन, ऊर्जा, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत चालले आहे. याचा परिणाम निश्चितच आपल्या भारतीय सिनेसृष्टीवरही होत आहे. परंतु, देशात सिनेमा निर्माण करण्यामागे लागणारे मूल्य वाढत चालले आहे. कधीकधी सिनेमा करण्यामागे अनावश्यक रक्कम टाकली जात आहे.”
कमल हासन यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, या आर्थिक तणावाचा भार कामगार, तंत्रज्ञ किंवा मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडता कामा नये. त्यांच्या पगार, सुरक्षितता, जेवण, प्रवास किंवा राहण्याच्या सुविधांमध्ये कपात होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. त्याऐवजी चित्रपटसृष्टीने अनावश्यक खर्च कमी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः मोठे ताफे (entourage), विनाकारण परदेशात शूटिंग, विलंब, आलिशान खर्च आणि दिखाऊपणावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. “प्रत्येक प्रेमकथा पॅरिसमध्येच का फुलली पाहिजे?” असा सवाल करत भारतातील सुंदर लोकेशन्सवर अधिक विश्वास ठेवण्याचेही त्यांनी सुचवले.
तसेच निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक, ओटीटी प्लॅटफॉर्म, वितरक आणि थिएटर मालक यांनी एकत्र येऊन चित्रपट निर्मिती अधिक शिस्तबद्ध आणि टिकाऊ कशी करता येईल यावर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. एकंदरीत, कमल हासन यांचा संदेश असा आहे की, सध्याच्या जागतिक आर्थिक परिस्थितीत भारतीय चित्रपटसृष्टीने दिखाऊ खर्च कमी करून जबाबदारीने आणि शहाणपणाने काम करण्याची गरज आहे.






