Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut: कंगनाची ९ वर्षांपूर्वीची रक्षाबंधन अॅड पुन्हा चर्चेत; कुनिका सदानंदने साधला निशाणा, नेटकरी म्हणाले- ‘गजब पाखंड.’

Kangana Ranau: कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीतील कपड्यांवर टीका करणारी कंगना राणौत आता स्वतःच्या ९ वर्षांपूर्वीच्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी कंगनाला ट्रोल केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 28, 2026 | 01:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना राणौत आपल्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री कृती सेननच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील कपड्यांवर टीका केली होती. मात्र, आता कंगनाचा तब्बल ९ वर्षांपूर्वीचा रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाला आहे.

कंगनाचा हा जुना जाहिरातीचा व्हिडीओ एका ज्वेलरी ब्रँडशी संबंधित आहे. या जाहिरातीत कंगना मॉडर्न ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यामुळे कृती सेननच्या अलीकडील जाहिरातीतील कपड्यांवर कंगनाने केलेल्या वक्तव्याशी तिच्या जुन्या जाहिरातीची तुलना केली जात आहे.

What is this? 🐒 pic.twitter.com/hW884AZdIM — RAHUL (@RahulSeeker) August 27, 2026

कुनिका सदानंदने साधला कंगनावर निशाणा

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १९’ची स्पर्धक कुनिका सदानंद यांनीही कंगनाच्या जुन्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनावर टीका करणारी एक पोस्ट त्यांनी एक्सवर री-पोस्ट केली आणि त्यावर उपरोधिक टिप्पणी करत लिहिलं, “मेरा कुत्ता कुत्ता, तेरा कुत्ता टॉमी???”

कुनिकाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा कंगना आणि कृती सेनन यांच्या जाहिरातींची चर्चा सुरू झाली आहे.

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाचं अजरामर गाणं कसं जन्माला आलं? ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’मागे दडलीये हृदयद्रावक कहाणी

नेटकऱ्यांनी कंगनाला केलं ट्रोल

कंगनाचा २०१७ सालचा जुना पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेक युजर्सनी कंगनाच्या त्या जाहिरातीतील लूकची तुलना कृतीच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीतील कपड्यांवर केलेल्या कंगनाच्या टीकेशी केली आहे.

एका युजरने कंगनावर टीका करत लिहिलं की, “तिचा क्लिव्हेज सांस्कृतिक धक्का आणि माझा क्लिव्हेज संस्कारी क्लिव्हेज?” तर आणखी एका युजरने कंगनाला ‘पाखंडी’ म्हटलं. काही युजर्सनी कंगनाच्या जुन्या जाहिरातीचा संदर्भ देत इतरांच्या कपड्यांवर भाष्य करण्याच्या तिच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमका वाद काय आहे?

काही दिवसांपूर्वी कृती सेनन एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीत दिसली होती. या जाहिरातीत तिने केप आणि ड्रेप्ड स्कर्टसोबत ब्रालेट-स्टाइल ब्लाउज परिधान केला होता. तसेच जाहिरातीत एका कुत्र्याला राखी बांधतानाचा प्रसंगही होता. या जाहिरातीवर सोशल मीडियावर मोठी चर्चा आणि टीका झाली होती.

यानंतर कंगना रनौतनेही कृतीच्या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली होती. कंगनाने महिलांकडे आज कपड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध असताना रक्षाबंधनासारख्या सणाच्या दिवशी अशा प्रकारचा पोशाख का निवडला, असा सवाल केला होता. तिने हा जाहिरातीचा प्रकार ‘अजीब’ आणि ‘डरावना’ असल्याचं म्हटलं होतं.

Amaal Mallik: अमाल मलिकचा मोठा निर्णय! संगीताला का दिला निरोप? ‘आवारापन 2’च्या संगीतकाराने स्वतः केला खुलासा

कृती सेननने दिलं होतं उत्तर

कंगनाच्या टीकेनंतर कृती सेनननेही सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तिने म्हटलं होतं की, सणाचं खरं महत्त्व एखाद्या महिलेने कोणते कपडे घातले आहेत यावर ठरत नाही, तर त्या परंपरा आणि त्यांच्या अर्थाविषयी तिच्या मनात असलेल्या भावनेवर ठरतं.

महिलांनी काय परिधान करावं, हे सांगणं कधी थांबवणार, असा सवालही कृतीने केला होता. “संस्कृती आणि परंपरा मनात असतात, गळ्याच्या नेकलाइनमध्ये नाहीत,” असा संदेश तिने दिला होता.

आता कंगनाचा जुना रक्षाबंधनाचा जाहिरात व्हिडीओ समोर आल्याने कृतीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, कुनिका सदानंद यांच्या पोस्टमुळे या प्रकरणाला आणखी रंगत आली आहे.

Web Title: Kangana ranaut old raksha bandhan ad kriti sanon controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kangana Ranaut
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?
1

Kapuskonda Movie: “कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?”; सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’ची पहिली झलक पाहिली का?

Amaal Mallik: अमाल मलिकचा मोठा निर्णय! संगीताला का दिला निरोप? ‘आवारापन 2’च्या संगीतकाराने स्वतः केला खुलासा
2

Amaal Mallik: अमाल मलिकचा मोठा निर्णय! संगीताला का दिला निरोप? ‘आवारापन 2’च्या संगीतकाराने स्वतः केला खुलासा

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाचं अजरामर गाणं कसं जन्माला आलं? ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’मागे दडलीये हृदयद्रावक कहाणी
3

Rakshabandhan 2026: रक्षाबंधनाचं अजरामर गाणं कसं जन्माला आलं? ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’मागे दडलीये हृदयद्रावक कहाणी

Apurva Nemlekar: अमेरिकेत रंगली अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर; नऊवारी साडी, झिम्मा-फुगडी अन् मराठमोळा थाट!
4

Apurva Nemlekar: अमेरिकेत रंगली अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर; नऊवारी साडी, झिम्मा-फुगडी अन् मराठमोळा थाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.