Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Kantara Chapter 1:‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या खास प्रसंगी होम्बले फिल्म्सने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 02, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kantara Chapter 1:  ऋषभ शेट्टीच्या बहुचर्चित ‘कंतारा’ चित्रपटाच्या प्रीक्वल ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महत्त्वाकांक्षी प्रीक्वल म्हणून सुरू झालेला हा प्रवास बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवत प्रेक्षकांच्या मनातही विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला. या खास टप्प्याचं औचित्य साधत निर्मात्या होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जगभरातील प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाचा खास टप्पा

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’नंतर त्याचा प्रीक्वल म्हणून ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. ऋषभ शेट्टीने या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारली. रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात पाहायला मिळाल्या.

होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरागंदूर आणि चालुवे गौडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.

कदंब काळाची पार्श्वभूमी

‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’ची कथा प्राचीन कदंब काळातील, वसाहतवादी राजवटीपूर्वीच्या किनारी कर्नाटकाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. पवित्र जंगलाची पौराणिक उत्पत्ती, मानवी लोभ आणि लोककथांमधील दैवी संदर्भ यांची सांगड चित्रपटाच्या कथेत घालण्यात आली आहे.

भावनिक कथानकासोबतच दमदार अॅक्शन आणि लोकसंस्कृतीशी जोडलेले घटक यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या संगीताचीही विशेष चर्चा झाली. बी. अजनीश लोकनाथ यांनी चित्रपटाचं संगीत दिलं आहे.

 

SIIMA पुरस्कार सोहळ्यातही ‘कंतारा’चा दबदबा

अलीकडेच पार पडलेल्या SIIMA Awardsमध्ये ‘कंतारा’ने दमदार कामगिरी करत एकूण ९ पुरस्कार आपल्या नावावर केले. चित्रपटाच्या यशात त्याच्या कथा, अभिनय, संगीत आणि दिग्दर्शनाचा महत्त्वाचा वाटा असल्याचं पाहायला मिळालं.

होम्बले फिल्म्सने मानले प्रेक्षकांचे आभार

‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होम्बले फिल्म्सने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून जगभरातील प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल निर्मात्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रोडक्शन हाऊसने म्हटलं की, आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आणि परंपरांशी जोडलेल्या या प्रवासाला जगभरातील प्रेक्षकांनी विशेष बनवलं असून, त्यांच्या प्रेमामुळे हा ‘कंतारा’च्या प्रवासातील अविस्मरणीय अध्याय ठरला आहे.

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

होम्बले फिल्म्सच्या आगामी प्रोजेक्ट्सची मोठी यादी

होम्बले फिल्म्सने आतापर्यंत ‘KGF’ फ्रँचायझी, ‘कंतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिम्हा’ यांसारख्या पॅन-इंडिया प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे. प्रोडक्शन हाऊस आगामी काळातही मोठ्या प्रोजेक्ट्ससह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आगामी चित्रपटांच्या यादीत ‘सालार: भाग 2 – शौर्यंगा पर्व’, ‘महावतार परशुराम’, ‘सूर्या 48’, ‘येथो का नाय’ आणि ऋतिक रोशनसोबतचा आगामी प्रोजेक्ट यांचा समावेश आहे.

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Web Title: Kantara chapter 1 one year anniversary hombale films ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • entertainment
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
1

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
2

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
3

Dharavu Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात
4

Dino Morea Arrested: डिनो मोरियाच्या अडचणीत वाढ, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेत्याला अटक; राहत्या घरातून घेतलं ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.