Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kantara SIIMA Awards: ‘कांतारा’ने रचला इतिहास; सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

Kantara SIIMA Awards: SIIMA Awardsमध्ये होम्बले फिल्म्सच्या ‘कांतारा’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला. चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तब्बल 9 पुरस्कार पटकावले.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 08:46 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Kantara SIIMA Awards: होम्बले फिल्म्सच्या बहुचर्चित ‘कांतारा’ चित्रपटाने साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA)मध्ये दमदार कामगिरी करत तब्बल 9 पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर, सर्वोत्कृष्ट संगीत आणि सर्वोत्कृष्ट गीतलेखन यांसह विविध विभागांमध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाले.

‘कांतारा’च्या या यशामुळे होम्बले फिल्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय सिनेमाच्या विश्वात दमदार कथा आणि भव्य निर्मितीसाठी ओळख निर्माण करणाऱ्या या प्रॉडक्शन हाऊसने यापूर्वीही अनेक लोकप्रिय चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत.

‘कांतारा’ची पुरस्कारांमध्ये दमदार कामगिरी

SIIMA पुरस्कार सोहळ्यात ‘कांतारा’ने विविध श्रेणींमध्ये आपली छाप पाडली. चित्रपटाच्या कथानकासोबतच दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संगीत आणि गीतलेखनासाठीही गौरव करण्यात आला. त्यामुळे ‘कांतारा’च्या टीमसाठी हा सन्मान विशेष महत्त्वाचा ठरला आहे.

होम्बले फिल्म्सच्या आगामी आणि यापूर्वीच्या चित्रपटांमध्ये ‘KGF’ फ्रँचायझी, ‘कांतारा’, ‘सालार’ फ्रँचायझी आणि ‘महावतार नरसिम्हा’ यांचा समावेश आहे. पॅन-इंडिया स्तरावर विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित करत या निर्मिती संस्थेने आपला विस्तार केला आहे.

‘हनुमान अंश’ही आंतरराष्ट्रीय स्तरावर

दरम्यान, होम्बले फिल्म्सचा ‘हनुमान अंश’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित केला जात आहे. त्यामुळे भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने हा प्रोजेक्ट महत्त्वाचा ठरत आहे.

याशिवाय होम्बले फिल्म्सने ‘महावतार नरसिम्हा’ या अॅनिमेटेड चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांना अॅनिमेशनच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडले आहे. भारतीय अॅनिमेशनला व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्याच्या दृष्टीनेही या चित्रपटाची चर्चा झाली.

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

आगामी प्रोजेक्ट्सची मोठी रांग

आगामी काळात होम्बले फिल्म्सचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये ‘सालार: पार्ट 2 – शौर्यांग पर्व’, ‘महावतार परशुराम’, ‘सूर्या 48’, ‘येतो का नाय’ यांचा समावेश आहे. तसेच अभिनेता ऋतिक रोशनसोबतच्या आगामी कोलॅबोरेशनचीही उत्सुकता आहे.

‘कांतारा’च्या SIIMAमधील 9 पुरस्कारांमुळे होम्बले फिल्म्सच्या यशस्वी प्रवासात आणखी एका उल्लेखनीय अध्यायाची भर पडली आहे.

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Web Title: Kantara siima awards hombale films 9 awards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 08:46 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • kantara 2

संबंधित बातम्या

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’,  गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
1

Ankita Lokhande: ‘ही दारू पिऊन आलीये का?’, गणपती आरतीदरम्यान अंकिताची ‘ती’ कृती चर्चेत; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
2

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…
3

Flight Turbulence: फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं? थरथर कापू लागली ‘अभिनेत्री’; देवाचा जप करत म्हणाली,…

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
4

Adinath Kothare New Movie: खून, तपास अन् रहस्यांचा थरार; आदिनाथ कोठारेच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.