Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Ant Ek Prarambh: आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपण्याचे आणि कुटुंबासाठी वेळ देण्याचे महत्त्व सांगणारा ‘अंत एक प्रारंभ’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर त्याचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 02, 2026 | 06:18 PM
Ant Ek Prarambh: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ant Ek Prarambh: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘अंत एक प्रारंभ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.
  • दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचा शेवटचा चित्रपट.
  • ६ नोव्हेंबरला अल्ट्रा झकासवर डिजिटल प्रीमियर
मुंबई, २ नोव्हेंबर २०२६ :- आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण काम, करिअर आणि स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यात इतके व्यस्त होतो की, कधीकधी आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढायला विसरतो. त्यामुळे डिजिटल युगात संवादाची साधनं वाढली जरी असली, तरी मनातल्या भावना व्यक्त करणं आणि नाती जपणं आजही तितकंच महत्त्वाचं आहे.

याच भावनेला स्पर्श करणारा ‘अंत एक प्रारंभ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते ‘अतुल परचुरे’ यांचा शेवटचा चित्रपट म्हणूनही या कलाकृतीला विशेष महत्त्व आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ६ नोव्हेंबर २०२६ ला या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. Ant Ek Prarambh:

कामाच्या व्यापामुळे राजवीरला

राजवीर आणि प्रद्युम्न या दोन भावांची ही कथा आहे. धाकटा भाऊ राजवीर कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो, तर मोठा भाऊ प्रद्युम्न स्वतःची कामे करू शकत नसल्याने त्याला सतत मदतीची गरज असते. कामाच्या व्यापामुळे राजवीरला आपल्या भावासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. त्यामुळे प्रद्युम्नची काळजी घेण्यासाठी तो एका केअरटेकरला त्यांच्या सोबत ठेवतो. मात्र, त्याचा हा निर्णय पुढे अनेक अनपेक्षित घटनांना कारणीभूत ठरतो आणि त्यांच्या नात्याची वेगळी बाजू समोर आणतो.

 

स्वतंत्र आयुष्य जगताना कुटुंब

या कथेतून दोन भावांमधील निःस्वार्थ प्रेम, नात्यांमधील जबाबदारी आणि आपल्या माणसांसाठी घेतलेल्या निर्णयांचं महत्त्व उलगडतं. आजच्या Gen Z पिढीला स्वतःची ओळख निर्माण करताना, करिअर आणि स्वतंत्र आयुष्य जगताना कुटुंबासाठी वेळ देणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव हा चित्रपट करून देतो. ‘अंत एक प्रारंभ’ ही कथा नात्यांकडे केवळ कर्तव्य म्हणून न पाहता, प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणाच्या नजरेतून पाहण्याचा एक हळवा संदेश देते.

मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळं

या चित्रपटाचं आणखी एक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचा सहभाग. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदाच्या खास शैलीने त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतं. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट असल्याने, त्यांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहणं चाहत्यांसाठी खास अनुभव ठरणार आहे.

दत्ता मोहन भंडारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, वसीम फरास, अतुल परचुरे, मोहन जोशी आणि गिरीश ओक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

Web Title: Ant ek prarambh atul parchure last film ultra zhakass ott premiere rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Entertainment News: प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन! आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार
1

Entertainment News: प्रदीप वेलणकर यांच्या ‘मनापासून’ पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन! आयुष्यभरातील अनुभवांचा अनोखा शब्दाविष्कार

Abhay Verma Shares Memorable Experience: शाहरुख यांच्या हजरजबाबीपणावर अभय वर्मा फिदा; ‘किंग’च्या सेटवरील आठवणींना दिला उजाळा
2

Abhay Verma Shares Memorable Experience: शाहरुख यांच्या हजरजबाबीपणावर अभय वर्मा फिदा; ‘किंग’च्या सेटवरील आठवणींना दिला उजाळा

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा
3

Amazon News : अमेझॉनवर दुचाकी खरेदीचा धुमाकूळ! विक्रीत तब्बल ६ पट वाढ; छोट्या शहरांचा मोठा वाटा

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क
4

Kaun Banega Crorepati: जिंकण्याआधीच मनं जिंकली! ऋषिकेशच्या दिलदार विचाराने माधुरी दीक्षितही थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.