Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: वादानंतर क्रिती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली; कपड्यांवरून झाला होता मोठा वाद

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीतील कपड्यांवरून वाद निर्माण झाला. कंगना रणौतसह अनेकांच्या टीकेनंतर कंपनीने जाहिरात मागे घेतली.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 26, 2026 | 01:31 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या आगामी चित्रपटांपेक्षा एका रक्षाबंधन विशेष जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीतील तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्वेलरी कंपनीसाठी कृतीने ही जाहिरात केली होती, त्या कंपनीने ती सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवल्याची माहिती समोर आली आहे.

कृती सॅनॉनला एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीत दाखवण्यात आले होते. या जाहिरातीत कृतीने पांढऱ्या रंगाचा ब्रॅलेटसदृश पोशाख परिधान केला होता. जाहिरातीमध्ये ती आपल्या भावाला तसेच एका पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दिसली. मात्र, तिच्या कपड्यांवरून काही नेटकऱ्यांनी आक्षेप घेत सोशल मीडियावर टीका करण्यास सुरुवात केली.

कंगना रणौतसह अनेकांनी केली टीका

या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद पुढे वाढत गेला. अभिनेत्री कंगना रणौतसह काही सेलिब्रिटींनीही कृती सॅनॉनच्या जाहिरातीवर टीका केली. त्यामुळे सोशल मीडियावर या जाहिरातीची चर्चा अधिकच रंगली.

वाद वाढल्यानंतर २६ ऑगस्ट रोजी कंपनीने कृती सेननची ही रक्षाबंधन जाहिरात यूट्यूबसह विविध प्लॅटफॉर्मवरून हटवली. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली.

GIVA removes its Raksha Bandhan ad featuring actress Kriti Sanon. GIVA — “We have the highest regard and deep respect for Indian culture, traditions and festivals. As a brand, we have always believed in celebrating these joyous moments with the entire family and this time we… pic.twitter.com/eTWv4Ax0uR — ANI (@ANI) August 26, 2026


Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

कंपनीने दिलं स्पष्टीकरण

जाहिरात मागे घेतल्यानंतर कंपनीने आपल्या निवेदनातून स्पष्टीकरण दिले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांबद्दल कंपनीला अत्यंत आदर असल्याचे त्यांनी म्हटले. रक्षाबंधनाचा आनंद संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करण्यासोबतच हा उत्सव पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आला होता.

मात्र, या जाहिरातीमुळे समाजातील काही घटकांच्या भावना नकळत दुखावल्या गेल्या असतील, तर तसा आपला कोणताही हेतू नव्हता, असे कंपनीने स्पष्ट केले. तसेच आदराचे प्रतीक म्हणून सर्व माध्यमांमधून जाहिरात मागे घेत असल्याचेही कंपनीने सांगितले.

कृती सेनेननेही दिलं सडेतोड उत्तर

दरम्यान, या जाहिरातीवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर कृती सेनननेही प्रतिक्रिया दिली होती. महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये, हे सांगणे थांबवले पाहिजे, असे अभिनेत्रीने म्हटले.

“महिलांनी काय घालावे किंवा काय घालू नये हे त्यांना सांगू नका. सण, चालीरीती आणि परंपरा यांचा कपड्यांशी काहीही संबंध नाही,” असे कृतीने आपल्या निवेदनात म्हटले.

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

आता कंपनीनेच ही जाहिरात मागे घेतल्याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुरू झालेला हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. जाहिरात, अभिनेत्रीचे कपडे आणि त्यानंतर कंपनीने घेतलेला निर्णय यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Web Title: Kriti sanon raksha bandhan ad controversy company remove ad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट
1

Marathi Serial: शांभवीचा डाव उलटणार? अनिकेत-छवीच्या घरवापसीने ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये मोठा ट्विस्ट

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ
2

Kuku Kohli Died: वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट; Love Story जन्मभर दिली साथ

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण
3

Exclusive: मीराची सुट्टी अन् गौतमची एंट्री! ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’मध्ये ऑफिसच्या समीकरणांना लागणार नवं वळण

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार
4

धाडस असेल तरच एकट्याने पाहा! 8 एपिसोडची ही हॉरर सीरिज देईल अंगावर काटा आणणारा थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.