Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Dixit : माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट; पोस्टर पाहताच पती श्रीराम नेनेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तिचं पोस्टर पाहून पती श्रीराम नेनेंनी खास कमेंट करत तिचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या..

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 11:37 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट
  • श्रीराम नेनेंनी केलं बायकोचं कौतुक
  • माधुरीच्या नव्या भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता
Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयासोबतच तिच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असते. आता माधुरी एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय शो ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच या लोकप्रिय शोचं सूत्रसंचालन एका अभिनेत्रीच्या खांद्यावर सोपवण्यात आलं आहे.

माधुरीची झलक असणारे खास प्रोमो नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘सोनी मराठी’ वाहिनीकडून लवकरच ‘कोण होणार करोडपती’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाणार आहे. मात्र, त्याआधीच माधुरीच्या या नव्या प्रोजेक्टसाठी मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

माधुरीच्या पोस्टरने वेधलं लक्ष

‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वासाठी माधुरीची निवड करण्यात आली आहे. शोच्या पोस्टरमध्ये तिचा खास आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. माधुरीच्या या नव्या भूमिकेमुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.

माधुरीने सोशल मीडियावर शोचं पोस्टर शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. पोस्ट पाहिल्यानंतर तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीही पत्नीचं कौतुक करत खास प्रतिक्रिया दिली.

Madhuri Dixit Comeback : २४ वर्षांनंतर टीव्हीवर कमबॅक; ‘धकधक गर्ल’च्या रिअॅलिटी शोची घोषणा

श्रीराम नेनेंनी केलं बायकोचं कौतुक

माधुरीच्या पोस्टवर कमेंट करताना श्रीराम नेने यांनी “Right On! What a Perfect Fit” असं म्हटलं आहे. म्हणजेच, ‘कोण होणार करोडपती’च्या होस्टच्या भूमिकेसाठी माधुरी ही अगदी योग्य व्यक्ती असल्याचं त्यांनी या प्रतिक्रियेतून सूचित केलं आहे.

पतीकडून मिळालेल्या या कौतुकामुळे माधुरीच्या चाहत्यांचंही लक्ष वेधलं गेलं आहे. सोशल मीडियावर या कमेंटची चर्चा पाहायला मिळत आहे.

माधुरीच्या नव्या भूमिकेची चाहत्यांना उत्सुकता

अभिनय आणि नृत्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर माधुरीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावली आहे. आता ती थेट क्विझ शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची सहजसुंदर शैली, संवाद साधण्याची पद्धत आणि प्रेक्षकांशी असलेली उत्तम कनेक्टिव्हिटी यामुळे ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाला वेगळी रंगत मिळण्याची अपेक्षा आहे.

माधुरी या शोचं सूत्रसंचालन कशा पद्धतीने करते आणि स्पर्धकांसोबत तिची केमिस्ट्री कशी जमते, हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे.

‘कोण होणार करोडपती’बद्दल काय म्हणाली माधुरी?

दरम्यान, या नव्या प्रवासाबद्दल माधुरी दीक्षितनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. तिच्या मते, ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ एक कार्यक्रम नसून महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या आशा, स्वप्नं आणि ज्ञानावरच्या विश्वासाचा उत्सव आहे.

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल

अशा प्रतिष्ठित मंचाचा भाग होण्याची संधी मिळणं हा तिच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं माधुरीने सांगितलं. या मंचावर येणाऱ्या स्पर्धकांची जिद्द, त्यांचा संघर्ष आणि स्वप्नांचा प्रवास जवळून अनुभवण्याची संधी मिळणार असल्याने ती या नव्या प्रवासासाठी उत्सुक असल्याचंही तिने म्हटलं आहे.

आता ‘कोण होणार करोडपती’च्या नव्या पर्वाची अधिकृत रिलीज डेट कधी जाहीर होते आणि माधुरी आपल्या सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मनं जिंकते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Madhuri dixit became the host of kon honar crorepati shriram nene reacts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Dr. Shri Ram Nene
  • Entertainemnt News
  • madhuri dixit

संबंधित बातम्या

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
1

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत
2

Tu Hi Re Maza Mitwa Serial: सुरू होतेय प्रेमाची लपाछपी; अर्णव-ईश्वरीच्या नात्यात नवा ट्विस्ट, मालिकेचा नवा प्रोमो चर्चेत

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण
3

Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याचं मोठं सत्य उलगडणार; मालिकेत नवं वळण

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली
4

The Paradise Box Office: नानीच्या ‘द पॅराडाइज’ची बंपर ओपनिंग; हिंदीत ‘हनुमान अंश’चा दबदबा कायम, ‘वाइब’-‘दायरा’ची कमाई मंदावली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.