Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेव्हा Abhishek Bachchan ला ‘शंभू राजे’ म्हणून हाक मारली जाते… अभिनेत्याने शेअर केला सिग्नलवरचा ‘तो’ किस्सा

Riteish Deshmukh दिग्दर्शित या सिनेमात अभिषेकने ‘शंभू राजे’ अर्थात संभाजी शाहाजी भोसले यांची भूमिका साकारली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख झळकला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 13, 2026 | 08:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख झळकला आहे.
  • मराठी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाने आपण भारावून गेलो असल्याचेही अभिषेकने नमूद केले.
  • रितेशवरील विश्वासामुळे या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने स्पष्ट केले.
‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता Abhishek Bachchan सध्या चर्चेत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. Riteish Deshmukh दिग्दर्शित या सिनेमात अभिषेक बच्चनने संभाजी शाहाजी भोसले अर्थात ‘शंभू राजे’ यांची भूमिका साकारली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः रितेश देशमुख झळकला आहे.

Exclusive: ‘स्वामींची भूमिका करण्याची जबाबदारी खूप मोठी, पेलण्याची आता गरज’ – सुनील गोडसे

एका मुलाखतीदरम्यान अभिषेकने चित्रपटानंतरचा एक खास अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी काही दिवसांपूर्वी ट्रॅफिक सिग्नलवर थांबलो असताना एका व्यक्तीने मला ‘शंभू राजे’ म्हणून आवाज दिला. माझ्या करिअरमध्ये असा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता.” या प्रसंगामुळे लोकांच्या मनात ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांबद्दल असलेला आदर आणि भावनिक जुळवणूक अधिक जाणवल्याचे त्याने सांगितले.

मराठी प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाने आपण भारावून गेलो असल्याचेही अभिषेकने नमूद केले. संभाजी शाहाजी भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील नातं, त्या काळातील संघर्ष आणि भावनिक बाजू समजून घेताना या भूमिकेशी आपण अधिक जोडले गेलो, असेही तो म्हणाला. या चित्रपटासाठी होकार देण्यामागे Riteish Deshmukh वरील विश्वास हे मुख्य कारण असल्याचे अभिषेकने स्पष्ट केले. “रितेश माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. तो मला कधीही चुकीच्या भूमिकेसाठी विचारणार नाही, याची मला खात्री होती,” असे सांगत त्याने दोघांमधील मैत्री आणि विश्वासाचाही उल्लेख केला.

The Maharashtra Files सिनेमाचा Music Launch सोहळा! ‘तेरी आंख्या का काजल’ गर्लचं मराठमोळं गाणं

रितेशने Raja Shivaji चित्रपटासाठी सर्वप्रथम ‘या‘ कलाकाराची केली होती कास्टिंग!

‘राजा शिवाजी’ चित्रपटासाठी सर्वप्रथम अभिनेता Abhishek Bachchan यालाच विचारणा करण्यात आली होती, असा खुलासा Riteish Deshmukh याने केला आहे. विशेष म्हणजे, अभिषेकने कोणती भूमिका साकारायची आहे हेही न विचारता या चित्रपटासाठी त्वरित होकार दिला होता. याबद्दल बोलताना रितेश म्हणाला, “गेल्या २३ वर्षांत मी कमावलेलं प्रेम आणि आदर याचं हे मोठं उदाहरण आहे.”रितेशने पुढे सांगितले की, “या चित्रपटासाठी Salman Khan, Abhishek Bachchan, Vidya Balan, Fardeen Khan, Boman Irani, Genelia आणि मी स्वतः कोणत्याही मानधनाशिवाय काम केलं आहे. आम्हा सर्वांनी हा चित्रपट मनापासून आणि पूर्णपणे ‘प्रो बोनो’ पद्धतीने केला.” कलाकारांनी केवळ चित्रपटाच्या कथानकावर आणि रितेशवरील विश्वासामुळे या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतल्याचेही त्याने स्पष्ट केले.

Web Title: Abhishek bachchan reacts to being called shambu raje at a traffic signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • abhishek bachchan
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
1

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा
2

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर येणार ऐतिहासिक चित्रपट; दिग्दर्शक अमित राय यांचा मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.