फोटो सौजन्य - Social Media
चित्रपटातील ‘मार तू शिक्का’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी Sapna Choudhary हिने गाण्याच्या हुकस्टेपवर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. या गाण्याचे बोल सुशील राठोड, विनायक पवार आणि दिपक अंगेवार यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत आणि अंबरीश यांनी दिले आहे. हे गाणे आनंद शिंदे, अंबरीश आणि वैशाली म्हाडे यांच्या आवाजात साकारण्यात आले आहे. चित्रपटातील ‘मन पाखरू’ हे भावनिक गाणे Guru Thakur यांनी लिहिले असून संगीत नितीन सावंत यांनी दिले आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजामुळे या गाण्याला वेगळीच उंची मिळाली आहे. तर Gautami Patil वर चित्रित करण्यात आलेले ‘छम्मो’ हे गाणेही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सखील आझमी लिखित या गाण्याला सिद्धार्थ कश्यप यांनी संगीत दिले असून साक्षी होळकर आणि राजा हसन यांनी ते गायलं आहे.
‘कती तू बंजारा’ हे गाणे डॉ. गीतकुमार पवार यांनी लिहिले असून शालिनी राठोड आणि राजा हसन यांच्या आवाजात साकारले आहे. तसेच Sunny Leone वर चित्रित झालेल्या ‘शांताबाई’ या गाण्याचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे गाणे संजय लोंढे यांनी गायलं आहे. या संगीत अनावरण सोहळ्याला Mangesh Desai, Usha Nadkarni, गौतमी पाटील, सपना चौधरी, Nagesh Bhosale आणि Sayaji Shinde यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते Sanjeevkumar Rathod यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचा अनुभव शेअर करत चित्रपटाच्या कथानकाचं विशेष कौतुक केलं.
चित्रपटातील प्रत्येक गाण्यामधून वास्तववादी आणि भावनिक अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. संगीतकार नितीन अजित, संजय लोंढे, सिद्धार्थ कश्यप आणि डॉ. गीतकुमार पवार यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. कलाकार आणि गायकांच्या दमदार परफॉर्मन्समुळे हा म्युझिक लॉन्च सोहळा विशेष ठरला. The Maharashtra Files हा चित्रपट येत्या २९ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






