Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Angre Marathi Movie : मराठा आरमाराचा इतिहास झळकणार मोठ्या पडद्यावर! सरखेल कान्होजीराजेंवर सिनेमा येतोय…’आंग्रे’

दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या जीवनावर आधारित 'आंग्रे' या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून, पोस्टरमध्ये समुद्राच्या लाटांमधून तलवार उंचावणारा मावळा आणि पार्श्वभूमीला मराठा आरमाराच्या युद्धनौका दिसत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 09, 2026 | 03:55 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेमाचे नाव ‘आंग्रे’ आहे.
  • सिनेमाविषयी अधिकृत माहितीही जाहीर करण्यात आली आहे.
  • चाहत्यांनी या सिनेमासाठी विशेष उत्सुकता दाखवण्यास सुरुवात केली आहे.
मराठी सिनेमासृष्टीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमावर आजवर अनेक सिनेमे बनले. हल्लीच प्रदर्शित झालेला सिनेमा ‘राजा शिवाजी’ ने मराठी सिनेसृष्टीला उंचावर नेले आहे. अशामध्ये सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. दिग्दर्शक राजेश मापुस्कर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या शौर्यावर सिनेमा करत आहेत. या संदर्भात पोस्ट करत त्यांनी सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. सिनेमाचे नाव ‘आंग्रे’ आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच करत सिनेमाविषयी अधिकृत माहितीही जाहीर करण्यात आली आहे.

Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांचं कुटुंब वारीच्या वाटेवर! सासऱ्यांचा ‘तो’ प्रश्न ऐकून लाजली पूजा बिरारी, VIDEO व्हायरल

‘आंग्रे’ या सिनेमाची निर्मिती विक्रम मल्होत्रा तसेच राजेश मापुस्कर मॅजिज पिक्चर्सच्या साहाय्याने करत आहेत. दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख तसेच कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, मापुस्करांच्या सिनेमांच्या चाहत्यांनी या सिनेमासाठी विशेष उत्सुकता दाखवण्यास सुरुवात केली आहे.

मापुस्करांनी पोस्ट करत केली घोषणा!

राजेश मापुस्कर यांनी ‘आंग्रे’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे. पोस्टरमध्ये समुद्राच्या प्रचंड लाटांमधून एक मावळा हात वर करत नंगी तलवार उंचावलेली दिसते. पार्श्वभूमीत मराठा आरमाराची युद्धनौका दिसत असून, संपूर्ण पोस्टरमधून शौर्य, पराक्रम आणि सागरी सामर्थ्याची झलक पाहायला मिळते.

Maniesh Paul Mother Death: “आज जग शांत वाटतंय…”, मनीष पॉलच्या आयुष्यात मोठी पोकळी; आईच्या आठवणीत भावूक झाला अभिनेता

पोस्टखाली कॅप्शनमध्ये नमूद केले आहे की, “मराठा आरमाराचे सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाची गाथा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आंग्रे’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट त्यांच्या जीवनकार्य, लढाऊ वृत्ती आणि अजरामर वारशावर आधारित आहे. परकीय आक्रमकांच्या संयुक्त शक्तीला तब्बल चार दशकांहून अधिक काळ खंबीरपणे तोंड देत भारताच्या पश्चिम किनारपट्टीचे संरक्षण करणाऱ्या आणि आयुष्यभर अपराजित राहिलेल्या या महान दर्यावर्दी सेनानीचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून साकारण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्या दिग्दर्शनाखाली आणि मॅजिज पिक्चर्सच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला जात आहे. भारतातील सर्वात पराक्रमी योद्ध्यांपैकी एक असलेल्या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या गौरवशाली इतिहासाची ओळख देशासह जगभरातील प्रेक्षकांना करून देण्याचा या चित्रपटाचा उद्देश आहे.”

Web Title: Angre marathi movie first look out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • hit movies
  • Indian Navy
  • Maratha Samaj

संबंधित बातम्या

Indian Navy : हिंद महासागरातील चीनचे आव्हान; नौदलप्रमुख कृष्णा स्वामीनाथन मॉरिशस दौऱ्यावर
1

Indian Navy : हिंद महासागरातील चीनचे आव्हान; नौदलप्रमुख कृष्णा स्वामीनाथन मॉरिशस दौऱ्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.