Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ankush Chaudhari Movie: अंकुश चौधरी पहिल्यांदाच भयपटातून प्रेक्षकांच्या भेटीला? ‘कुकाई’च्या घोषणेने वाढली उत्सुकता

Ankush Chaudhari Movie: अभिनेता अंकुश चौधरी आगामी मराठी भयपट ‘कुकाई’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी किल्लेकर निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कुकाई’ची निर्मिती कोण करणार?
  • अंकुश चौधरीच्या भूमिकेबद्दल उत्सुकता
  • जान्हवी किल्लेकरची निर्मितीक्षेत्रात नवी इनिंग
Ankush Chaudhari Movie: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कुकाई’ या आगामी भयपटात तो दिसणार असून, या चित्रपटाची घोषणा नुकतीच घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली. आजवर विविध धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अंकुश आता भयपटाच्या माध्यमातून काय वेगळं सादर करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत भयपटांचे प्रयोग तुलनेने कमी पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत ‘कुकाई’ या आगामी चित्रपटामुळे या प्रकारातील नव्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटातील अंकुशची भूमिका कशी असेल आणि कथेत नेमकं कोणतं रहस्य दडलेलं असेल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

‘कुकाई’ची निर्मिती कोण करणार?

‘कुकाई’ या चित्रपटाची निर्मिती स्वरुप स्टुडिओज आणि देवी सातेरी प्रॉडक्शन्स करत आहेत. प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार हे चित्रपटाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात नवी जबाबदारी स्वीकारत आहे. तिच्या जान्हवी प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेद्वारे ती प्रथमच सहनिर्माती म्हणून काम पाहणार आहे.

चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं आहे. आशिष टिळक आणि शब्बीर नाईक यांनी पटकथा व संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. रोहन मडकईकर छायांकन करणार असून, चिनार महेश संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. अतुल साळवे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहत आहेत.

अंकुश चौधरीच्या भूमिकेबद्दल उत्सुकता

अंकुश चौधरीने आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रत्येक चित्रपटातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणारा अंकुश आता भयपटात कोणत्या रूपात दिसणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ‘कुकाई’मधील त्याची भूमिका आणि चित्रपटाचं कथानक याबाबतची माहिती सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

अंकुशसोबत या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार, याचाही खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण यादी आणि इतर तपशील जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?

जान्हवी किल्लेकरची निर्मितीक्षेत्रात नवी इनिंग

अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी जान्हवी किल्लेकर आता निर्मितीक्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. ‘कुकाई’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती प्रथमच सहनिर्माती म्हणून काम करणार आहे. अभिनयासोबतच चित्रपटनिर्मितीची नवी जबाबदारी स्वीकारत तिने वेगळ्या धाटणीच्या भयपटाची निवड केली आहे.

आता ‘कुकाई’मधून अंकुश चौधरी प्रेक्षकांसमोर कोणतं नवं रूप घेऊन येणार आणि जान्हवी किल्लेकरची निर्मितीक्षेत्रातील ही नवी सुरुवात कशी ठरणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Web Title: Ankush chaudhari movie kukai horror movie announcement janhvi killekar ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज
1

Suruchi Adarkar: मुलगी झाली हो! सुरुची अडारकर-पियुष रानडे झाले आई-बाबा; घटस्थापनेच्या दिवशी दिली गुडन्यूज

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?
2

Drishyam 3 Box Office: ‘दृश्यम ३’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! दुसऱ्या शनिवारी ‘सिंघम अगेन’चा रेकॉर्ड मोडला?

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
3

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Nushrratt Bharuccha Health Update: ‘पिक्चर अभी बाकी..’, अपघातानंतर नुसरतची पहिली पोस्ट चर्चेत; शस्त्रक्रियेनंतर लिहिला खास मेसेज
4

Nushrratt Bharuccha Health Update: ‘पिक्चर अभी बाकी..’, अपघातानंतर नुसरतची पहिली पोस्ट चर्चेत; शस्त्रक्रियेनंतर लिहिला खास मेसेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.