
फोटो सौजन्य - Social Media
पोस्ट करत दिली माहिती!
अभिनेता अंशुमन विचारेने त्याच्या पत्नीसह कोलॅब करून नव्या गाडीची पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याच्या नव्या गाडीला पुजले जात आहे. नारळ फोडून त्याने नव्या लक्ष्मीचे स्वागत केले आहे. तसेच गाडीची किल्ली अंशुमनच्या लेकीच्या स्वाधीन करण्यात आली होती. पोस्टखाली कॅप्शनमध्ये ‘New addition in the family 😇 5th June नक्की बघा तुंबाडची मंजुळा’ असे नमूद करण्यात आले आहे.
कोणती गाडी घेतली?
अंशुमन विचारेने Mahindra XEV 9S electric SUV या गाडीची खरेदी केली आहे. एकंदरीत, Mahindra XEV 9S ही महिंद्राची प्रीमियम, पूर्णपणे इलेक्ट्रिक ७-सीटर SUV असून ती आधुनिक INGLO skateboard architecture वर आधारित आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत ₹19.95 लाख ते ₹29.45 लाख दरम्यान आहे. यात 59 kWh, 70 kWh आणि 79 kWh असे तीन LFP blade battery पर्याय देण्यात आले असून RWD प्रणालीसह 228bhp ते 282bhp पर्यंत पॉवर आणि 380Nm टॉर्क मिळतो. 79 kWh बॅटरीवर कंपनीने 679 किमीपर्यंतची ARAI प्रमाणित रेंज दिली असून शहरात प्रत्यक्ष वापरात सुमारे 500 किमीपर्यंत रेंज मिळू शकते. 180kW DC फास्ट चार्जिंगमुळे ही SUV केवळ 20 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होते. कुटुंबासाठी उपयुक्त अशा 3-रो लेआउटमध्ये येणाऱ्या या SUV मध्ये 150 लिटर फ्रंक आणि तिसरी रांग फोल्ड केल्यावर 527 लिटर बूट स्पेस मिळते. दुसऱ्या रांगेत ventilated आणि adjustable सीट्ससह rear boss mode दिला आहे. फीचर्समध्ये 12.3-इंचाचा triple-screen dashboard, AR head-up display, panoramic sunroof, Harman Kardon sound system, ventilated seats आणि Mahindra MAIA central computer यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी Level 2 ADAS, 7 airbags, 360-degree camera आणि remote auto-parkसारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत.
तुंबाडची मंजुळा!
अभिनेता Anshuman Vichare त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेता 5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणाऱ्या तुंबाडची मंजुळा या चित्रपटात झळकणार आहे.