Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhagubai OTT Release: वाद निर्माण करणारी की नाती जोडणारी? ‘भागुबाई’ची खरी गोष्ट पहा ‘अल्ट्रा झकास’वर

‘भागुबाई’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आता ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गावातील नाती, गैरसमज, गप्पा आणि माणुसकी यांची रंजक कथा या चित्रपटातून उलगडते. निर्मिती सावंत यांनी साकारलेली भागुबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 12, 2026 | 05:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • निर्मिती सावंत यांनी साकारलेली भागुबाई ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायलाही भाग पाडते.
  • संवादाचे महत्त्व यांचा वेध घेणारे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
  • हृदयाला स्पर्श करणारी कथा!
मराठी चित्रपटसृष्टीतील कौटुंबिक, हलक्याफुलक्या आणि आशयघन कथानकांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळत आली आहे. अशाच एका वेगळ्या आणि मनोरंजक कथानकाचा बहुचर्चित मराठी चित्रपट ‘भागुबाई’ आता डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गावातील नाती, गप्पा, गैरसमज आणि माणुसकीचा वेध घेणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 12 जून 2026 पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात संपूर्ण कुटुंबासोबत बसून मनोरंजनासोबतच एखादा सकारात्मक संदेश देणारा चित्रपट पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ‘भागुबाई’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. विनोद, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.

Marathi Serial Update : लग्नमंडपात होणार मोठा खुलासा; लग्नसोहळ्यात प्रतापरावांची अनपेक्षित एन्ट्री, मोहिनी मालिकेत मोठा ट्विस्ट

चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे भागुबाई ही व्यक्तिरेखा. मनमिळाऊ, मदतीसाठी नेहमी तत्पर आणि गावातील प्रत्येक घडामोडीची माहिती ठेवणारी अशी तिची ओळख आहे. गावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची तिला खबर असते आणि नकळत ती त्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवत राहते. तिच्या या सवयीमुळे अनेकदा मजेशीर प्रसंग निर्माण होतात, तर कधी गैरसमज आणि वादालाही तोंड फुटते. मात्र, भागुबाईच्या बोलण्यामागे कोणाचेही नुकसान करण्याचा हेतू नसतो. उलट तिच्या मनात गावातील लोकांविषयी आपुलकी आणि त्यांचे भले व्हावे अशीच भावना असते. पण तिच्या या स्वभावामुळे एका टप्प्यावर गावात मोठा गोंधळ निर्माण होतो आणि घटनांच्या ओघात तिचा आवाजही जातो. त्यामुळे काही काळ ती बोलू शकत नाही.

याच काळात गावकऱ्यांना भागुबाईचे खरे महत्त्व समजू लागते. तिच्या गप्पा थांबल्यानंतर गावात एक वेगळीच शांतता निर्माण होते. मात्र, जेव्हा ती पुन्हा बोलू लागते, तेव्हा अनेक नात्यांमधील दडलेली सत्ये समोर येतात. तिच्या वागण्यामागचा खरा उद्देशही उलगडतो. त्यानंतर गावकऱ्यांना जाणवते की, तिच्या बोलण्यात जरी कधी टोचणी असली तरी त्यामागे लोकांचे भले करण्याचीच भावना दडलेली होती. चित्रपटातील भागुबाई ही भूमिका अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी साकारली आहे. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे ही व्यक्तिरेखा अधिक जिवंत झाली आहे. त्यांच्या सोबत शशांक शेंडे, मंगेश देसाई, विजय पाटकर आणि भार्गवी चिरमुले यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत कथेला अधिक रंगत आणली आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले असून श्रद्धा पटेल यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. ग्रामीण जीवनातील नातेसंबंध, मानवी स्वभाव आणि समाजातील संवादाचे महत्त्व यांचा वेध घेणारे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष रंगमंचावर, ‘पाण्याने पेटला वणवा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चवदार तळे सत्याग्रहाचा संघर्ष उलगडणार

याबाबत अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, मराठी प्रेक्षकांना दर्जेदार आणि कौटुंबिक मनोरंजन देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. ‘भागुबाई’ हा चित्रपट विनोद, भावना आणि सकारात्मक सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ आहे. भागुबाईचे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आणि तिची कथा प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला स्पर्श करेल, असा आम्हाला विश्वास आहे. हास्य, भावनिक क्षण, कौटुंबिक नाती आणि विचार करायला लावणारा संदेश यांचा सुरेख संगम असलेला ‘भागुबाई’ हा चित्रपट आता संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर अवघ्या 19 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच हृदयाला स्पर्श करणारी कथा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

Web Title: Bhagubai ott release on ultra zakaas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • latest movies
  • OTT

संबंधित बातम्या

Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या  ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल, ‘या’ ५ चित्रपटांनी मिळवलं टॉप ५मध्ये स्थान
1

Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल, ‘या’ ५ चित्रपटांनी मिळवलं टॉप ५मध्ये स्थान

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या
2

Toxic OTT Release: थिएटरनंतर यशचा ‘टॉक्सिक’ ओटीटीवर; नयनताराचा सिनेमा कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Haiwaan OTT Release: थिएटरनंतर ‘हैवान’ची OTTवर एन्ट्री; कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहता येणार अक्षय-सैफचा चित्रपट?
3

Haiwaan OTT Release: थिएटरनंतर ‘हैवान’ची OTTवर एन्ट्री; कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहता येणार अक्षय-सैफचा चित्रपट?

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!
4

Deool band 2 OTT: बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर ‘देऊळ बंद २’ची OTTवर एन्ट्री; आता घरबसल्या पाहता येणार सिनेमा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.