Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Pallavi Movie: साई पल्लवीचा नवा अवतार पाहिलात का? ‘ओम: चैप्टर 1’मध्ये IPS नित्या रेड्डीची भूमिका

Sai Pallavi Movie: साई पल्लवी ‘ओम: चैप्टर 1’ चित्रपटात IPS अधिकारी नित्या रेड्डीच्या भूमिकेत दिसणार आहे. धनुष, ममूटी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 27, 2026 | 03:03 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sai Pallavi Movie:  दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिच्या रामायण चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटात ती माता सीतेची भूमिका साकारत आहे. या तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असताना ती लवकरच ‘ओम: चैप्टर 1’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची झलक समोर आली आहे. निर्मात्यांनी नुकताच तिचा टीझर प्रदर्शित केला असून, यात साई पल्लवी IPS अधिकारी नित्या रेड्डीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

साई पल्लवीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्सने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता खाकी वर्दीतला तिचा हा नवा अंदाज चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. धनुष आणि ममूटी यांसारख्या दिग्गज कलाकारांची मांदियाळी असलेल्या या चित्रपटात साईची भूमिका नेमकी काय असेल, याबाबत निर्मात्यांनी अद्याप गुपित कायम ठेवलं आहे.

खाकी वर्दीत साई पल्लवीचा दमदार अंदाज

प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणारी साई पल्लवी यावेळी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या टीझरमध्ये नित्या रेड्डी या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. तिची देहबोली आणि पडद्यावरील उपस्थिती यामुळे ही भूमिका चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळतात. मात्र, नित्या रेड्डीच्या व्यक्तिरेखेचे कथानकातील नेमके स्थान काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा खान्देशी अंदाज; संदीप भामरेच्या संघर्षाची कहाणी ऐकून प्रेक्षक भावुक!

निर्मात्यांनी व्यक्त केला आनंद

साई पल्लवीच्या चित्रपटातील सहभागाबद्दल बोलताना आरटेक स्टुडिओजच्या निर्मात्या श्रद्धा अग्रवाल म्हणाल्या, “साई पल्लवी एक अप्रतिम अभिनेत्री आहे. तिच्या प्रत्येक भूमिकेतून दिसणारा प्रामाणिकपणा आम्हाला नेहमीच भावला आहे. नित्या रेड्डी ही चित्रपटातील एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी साईपेक्षा उत्तम अभिनेत्री आम्हाला मिळूच शकली नसती. साई आमच्या चित्रपटाचा भाग आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. प्रेक्षक तिला या भूमिकेत पाहतील, याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”

धनुष, ममूटीसह दिग्गज कलाकारांची फौज

राजकुमार पेरियासामी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘ओम: चैप्टर 1’मध्ये साई पल्लवीसोबत धनुष, ममूटी, श्रीलीला आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. आरटेक स्टुडिओज आणि वंडरबार फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असल्याचं सांगितलं जात आहे.

साई पल्लवीच्या नव्या व्यक्तिरेखेची झलक समोर आल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. २० नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नित्या रेड्डीच्या भूमिकेत साई पल्लवीचा अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Abhijeet Sawant: अभिजीत सावंत घेऊन येतोय ‘90’s बँड’; नव्वदीच्या गाण्यांची पुन्हा रंगणार मैफल!

Web Title: Sai pallavi new avatar after ramayana om chapter 1 ips nithya reddy role ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • entertainment
  • latest movies
  • Sai Pallavi

संबंधित बातम्या

B.P. Singh Passes Away: मनोरंजनविश्वावर शोककळा! ‘CID’चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

B.P. Singh Passes Away: मनोरंजनविश्वावर शोककळा! ‘CID’चे निर्माते बी.पी. सिंह यांचं निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा खान्देशी अंदाज; संदीप भामरेच्या संघर्षाची कहाणी ऐकून प्रेक्षक भावुक!
2

Madhuri Dixit: ‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षितचा खान्देशी अंदाज; संदीप भामरेच्या संघर्षाची कहाणी ऐकून प्रेक्षक भावुक!

Abhijeet Sawant: अभिजीत सावंत घेऊन येतोय ‘90’s बँड’; नव्वदीच्या गाण्यांची पुन्हा रंगणार मैफल!
3

Abhijeet Sawant: अभिजीत सावंत घेऊन येतोय ‘90’s बँड’; नव्वदीच्या गाण्यांची पुन्हा रंगणार मैफल!

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’मध्ये सुबोध भावे कोणाची भूमिका साकारणार? अंतिम टीझरमुळे चर्चांना उधाण
4

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’मध्ये सुबोध भावे कोणाची भूमिका साकारणार? अंतिम टीझरमुळे चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.