Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 : सिनेमाच्या यशामुळे कौतुकाचे वारे! प्रसाद ओक म्हणाला “प्रवीण आमच्या पिढीतला एकमेव दिग्दर्शक ज्याने…”

देऊळबंद 2 सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे. या यशानिमित्त अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने प्रवीण तरडेचे मनापासून कौतुक केले. "स्वामींचा आशीर्वाद असल्याने प्रवीण पुढची 50 वर्षे मागे वळून पाहणार नाही," असे तो म्हणाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2026 | 03:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सिनेप्रेक्षकांचे विशेष प्रतिसाद लाभले आहे.
  • ‘घबाडकुंड’ सिनेमालाही चांगलं यश मिळालं आहे.
  • अगदी तुझ्या स्वभावानुसार.” अशी कमेंट केली आहे.
देऊळ बंद 2 सिनेमाने इतिहास रचला आहे. 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणारा तिसरा मराठी सिनेमा म्हणून ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे नाव सुवर्णाक्षरात नमूद झाले आहे. 9 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करतो, ही काही सोप्पी गोष्ट नव्हे. दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि संपूर्ण ‘देऊळबंद 2’ सिनेमाच्या टीमचे कौतुक केले जात आहेत. मराठी सिनेविश्वातील विविध कलाकारांनी तसेच दिग्दशकांनी प्रवीण तरडे आणि त्याच्या टीमसाठी विशेष पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट सध्या चर्चेत आहेत. यामध्ये अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टला सिनेप्रेक्षकांचे विशेष प्रतिसाद लाभले आहे.

Gen-Z कमिटमेंटला घाबरत नाही! सिद्धार्थ मेननने नातेसंबंधांवर मांडला वेगळा दृष्टिकोन

खास प्रवीण तरडेसाठी प्रसाद ओक लाईव्ह आला होता. तसेच या सिनेमामध्ये स्वतः प्रसाद ओकचा खारीचा वाटा आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रसाद म्हणतो की, “आमचा सिनेमा ‘देऊळबंद 2’ ने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. अगदी जगभरातून सिनेमाला गेल्या 40 दिवसांपासून भरभरून प्रतिसाद मिळतोय.” देऊळबंद 2 सिनेमासह प्रसादने मराठी सिनेविश्वातील हल्लीच प्रदर्शित झालेल्या इतर सिनेमांचेही आवर्जून कौतुक केले आहे. तो म्हणतो की, “गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमांना सुखाचे दिवस आले आहेत. हल्लीच राजा शिवाजी सिनेमाने 130 कोटींचा टप्पा गाठला. ‘तुंबाडची मंजुळा’ सिनेमाही उत्तम चालला आहे. ‘घबाडकुंड’ सिनेमालाही चांगलं यश मिळालं आहे.”

या संपूर्ण लाईव्हमध्ये प्रसादने देऊळ बंद 2 सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे आवर्जून कौतुक केले आहे. प्रसाद म्हणतो की, “आजपर्यंत या माणसाला सरस्वती आणि लक्ष्मी दोघी प्रसन्न होत्या. परंतु, आता स्वामीही त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आमच्या प्रवीणला आता कसलीही चिंता नाहीये. आमचा विश्वास आहे की आता पुढची किमान 50 वर्षे तरी प्रवीण काही मागे वळून पाहणार नाही.” सिनेमाविषयी सांगताना प्रसाद सांगतो की, “मी स्वतः या सिनेमाचा भाग आहे त्यामुळे सिनेमा तयार होताना मी पाहिला आहे. पावसात झालेलं नुकसान आणि बऱ्याच हालापष्टेतून, ज्याप्रकारे प्रवीणने हा सिनेमा उभा केला आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे.”

Toxic: ‘टॉक्सिक’मधील अभिनेत्रींचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज; नयनतारा, कियारासह स्टारकास्टचा दमदार अंदाज

सगळ्यात विशेष म्हणजे, प्रसाद म्हणतो की, “प्रवीण आमच्या पिढीतला एकमेव दिग्दर्शक आहे ज्याने एका मागोमाग एक हिट चित्रपट दिले आहेत. देऊळबंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीराव, धर्मवीर 2 आणि आता देऊळबंद 2! मी स्वतः धर्मवीर, धर्मवीर 2 आणि देऊळबंद 2 या सिनेमाच्या माध्यमातून त्याला काम करताना पाहिले आहे. त्याच्या कामाची निष्ठा पहिली आहे.”

या पोस्ट खाली सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेने “वा वा वा वा मित्रा काय सुंदर बोललायेस! अगदी तुझ्या स्वभावानुसार.” अशी कमेंट केली आहे.

Web Title: Deool band 2 prasad oak praised pravin tarde post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • prasad oak
  • pravin tarade
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा
1

Jai Jai Swami Samarth : पाच आठवडे, पाच दिव्य गुरुरूपांचा साक्षात्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा

Deool Band 2 : सिनेमाच्या कथेतही पत्नीचं योगदान! आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो, स्नेहल तरडेने कथाच बदलली
2

Deool Band 2 : सिनेमाच्या कथेतही पत्नीचं योगदान! आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो, स्नेहल तरडेने कथाच बदलली

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन
3

Pravin Tarde : ‘पहिली भेट दादांच्या चरणी’; ‘देऊळबंद 2’ सिनेमाचे 100 कोटी पार! अजित पवारांच्या स्मृतिस्थळी केले वंदन

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप
4

Deool Band 2 : प्रवीण तरडेंसाठी लांजेकरांची खास पोस्ट! ‘मराठी सिनेमाचा झेंडा…’ सिनेसृष्टीतून कौतुकाची थाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.