Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharau Marathi Movie: पाकिस्तानातही मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा डंका! अधिकृत टीझर प्रदर्शित, २६ पुरस्कारांचा मान

Dharau Marathi Movie: मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा अधिकृत टीझर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांच्या दाव्यानुसार चित्रपटाला २६ पुरस्कार मिळाले असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 09, 2026 | 05:58 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Dharau Marathi Movie: ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ या लक्षवेधी टॅगलाइनमुळे चर्चेत आलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘धाराऊ’चा अधिकृत टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनशैली, भारतीय संस्कृती आणि गोमातेप्रती असलेली श्रद्धा यांची झलक या टीझरमधून पाहायला मिळते. एका लहान मुलाचे आणि गायीचे भावनिक नाते अधोरेखित करणाऱ्या या टीझरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला आतापर्यंत २६ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा दावा दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांनी केला आहे. पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

पाकिस्तानातील चित्रपट महोत्सवात ‘धाराऊ’चा गौरव

दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘धाराऊ’ला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने चित्रपटाच्या प्रवासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पाकिस्तानातील पेशावर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू फीचर फिल्म’ पुरस्कार मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले. या सन्मानामुळे चित्रपटाच्या विषयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटामागील भूमिका स्पष्ट करताना दिग्दर्शक मनिष सुरेश शिंदे म्हणाले की, प्रत्येक जण आपल्या परीने गोमातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी काम करत असतो. कुणी गोशाळा उभारून गोपालन करतो, तर कुणी विविध माध्यमांतून जनजागृती करतो. चित्रपटाच्या माध्यमातून या विषयावर भाष्य करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदू धर्मात गायीला मातेचे स्थान का दिले जाते आणि ती पूजनीय का मानली जाते, यामागील भावना व विचार ‘धाराऊ’मधून मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले. चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आनंद व्यक्त करताना, चित्रपटामागचा विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

लहान मुलगा आणि गायीच्या नात्याची भावनिक कथा

‘धाराऊ’च्या टीझरमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातील वातावरण, धार्मिक स्थळांची पार्श्वभूमी आणि गायीच्या सहवासातील बालपणाची झलक पाहायला मिळते. गोमातेप्रती श्रद्धा, माणुसकी, ग्रामीण संस्कृती आणि भावनिक नात्यांचा वेध या चित्रपटातून घेण्यात आला आहे. ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ ही टॅगलाइन या नात्याची भावनिक खोली अधोरेखित करते.

टीझरमधील दृश्यांमुळे चित्रपटाच्या कथेविषयी कुतूहल निर्माण झाले असून, ग्रामीण जीवनातील श्रद्धा आणि माणुसकीचे पैलू मोठ्या पडद्यावर कशा प्रकारे मांडले जाणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Gondhal Marathi Movie: ऑस्कर २०२७ मध्ये ऐतिहासिक झेप! होम्बळे फिल्म्सच्या माध्यमातून ‘गोंधळ’ चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार

२३ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत होणार प्रदर्शित

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत ‘धाराऊ’ या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मनिष सुरेश शिंदे यांनी सांभाळली आहे.

‘धाराऊ’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अधिकृत टीझरच्या प्रदर्शनासह चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारांची चर्चा सुरू झाली असून, आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहेत.

Tanushree Dutta: ‘त्यांच्या नावावर फुटेज..’, तनुश्री दत्ताच्या नाना पाटेकरांवरील वक्तव्याने नवा वाद; रोजलीन खानचा संताप, म्हणाली..

Web Title: Dharau marathi movie official teaser peshawar film festival award ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित
1

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी
2

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

Jai Shree Ram Marathi Movie: ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन
3

Jai Shree Ram Marathi Movie: ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन

Daryabhavani Movie Shooting in Konkan: शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा आता रुपेरी पडद्यावर! ‘दर्याभवानी’चे पूर्णगडावर चित्रीकरण
4

Daryabhavani Movie Shooting in Konkan: शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा आता रुपेरी पडद्यावर! ‘दर्याभवानी’चे पूर्णगडावर चित्रीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.