Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jhimma 3 Teaser: प्रतीक्षा संपली! ‘सहलीला जायाचं, जायाचं सहलीला’ म्हणत ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर प्रदर्शित

Jhimma 3 Teaser: पहिल्या दोन चित्रपटाच्या कमालीच्या यशानंतर आता पुन्हा एकदा हेमंत ढोमेचा झिम्मा ३ प्रेक्षकांचं मनोरंंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्मा ३ चित्रपटाचं धमाल टीझर प्रदर्शित

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 21, 2026 | 09:25 PM
झिम्मा ३ चा मजेशीर टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

झिम्मा ३ चा मजेशीर टीझर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

Follow Us
Follow Us:
  • झिम्मा ३ चे धमाल टीझर प्रदर्शित 
  • पहिल्या दोन चित्रपटाच्या कमालीच्या यशानंतर आता झिम्मा ३ 
  • १ जानेवारी, २०२७ रोजी येणार प्रेक्षकांचं मनोरंजन करायला
Jhimma 3 Teaser: क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम च्या भव्य यशानंतर, झिम्मा’ आणि ‘झिम्मा २’मधून महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती, स्वभाव आणि त्यातून रंगणारी धमाल अनुभवायला देणारे दिग्दर्शक हेमंत ढोमे आता ‘झिम्मा ३’ मधून एक नवा धमाका घेऊन येत आहेत. यावेळी सहलीचा बेत महिलांचा नसून पुरुषांचा आहे!  

इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित ‘झिम्मा ३’चा धमाल टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत पुरुषांची ही भन्नाट टोळी श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहे. विशेष म्हणजे, यावेळी हेमंत ढोमे केवळ लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार नसून अभिनयातूनही या धमाल टोळीचा भाग होणार आहेत.

टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

टीझरमधूनच या सहलीची रंगतदार झलक पाहायला मिळते. कोणी उत्साही, कोणी गंभीर, कोणी मिश्कील, तर कोणी आपल्या वेगळ्याच अंदाजात वावरणारा! वय, स्वभाव, विचार, जगण्याची पद्धत आणि प्रत्येकाची पार्श्वभूमीही निरनिराळी. अशा एकमेकांपेक्षा अगदी वेगळ्या असलेल्या या मंडळींची गाठ एका सहलीच्या निमित्ताने पडली आहे. आता या सगळ्यांना एकाच छताखाली, एकाच प्रवासात आणल्यानंतर काय धमाल उडणार? कोण कोणाच्या सुरात सूर मिसळणार आणि कोण कोणाला नाकीनऊ आणणार? याची उत्सुकता टीझरमुळे अधिकच वाढली आहे. सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी कलाकारांची तगडी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Jhimma 3 Movie : ‘यावेळी तिसराच आहे!’, ‘झिम्मा ३’ची पहिली झलक समोर; नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

यावेळी रंगणार पुरुषांचा झिम्मा 

महिलांच्या सहलीतून नात्यांचे, मैत्रीचे आणि भावविश्वाचे अनेक रंग उलगडणाऱ्या ‘झिम्मा’ मालिकेत यावेळी पुरुषांच्या मैत्रीचा, त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा आणि एकमेकांशी जुळवून घेताना होणाऱ्या गंमतीजमतींचा नवा पट उलगडणार आहे. श्रीलंकेचे निसर्गरम्य लोकेशन्स, वेगवेगळ्या स्वभावांची ही रंगतदार जुगलबंदी आणि अनपेक्षित प्रसंगांची रेलचेल यामुळे ‘झिम्मा ३’ची ही सहल प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची भन्नाट मेजवानी ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट नववर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेमंत ढोमेची प्रतिक्रिया

दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा २ ’ला मिळालेल्या प्रेमामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. महिलांच्या सहलीतून अनेक सुंदर गोष्टी मांडल्यानंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांच्या स्वभावातील वेगळेपण, गमतीजमती आणि धमाल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात ५ वर्षांनी पुन्हा अभिनय करण्याची संधीही मिळाल्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी आणखी खास आहे. वेगवेगळ्या स्वभावांची ही मंडळी एकत्र आल्यावर पडद्यावर काय रंगत येते, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. पण हा सिनेमा फक्त तिचा किंवा त्याचा न राहाता सगळ्यांचा होतो.’

‘झिम्मा ३’ चं धमाकेदार पोस्टर रिलीज! हेमंत ढोमेच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट

क्षिती जोगनेही व्यक्त केल्या भावना 

निर्माती क्षिती जोग म्हणाली की, ‘झिम्मा’च्या दोन्ही भागांना मिळालेलं प्रेम आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. त्यामुळे ‘झिम्मा ३’ करताना प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन काहीतरी नवीन देणं महत्त्वाचं होतं. यावेळी पुरुषांची टोळी आणि श्रीलंकेची सफर हा एक वेगळाच अनुभव आहे. प्रत्येक कलाकाराचा स्वभाव आणि त्यांची एकमेकांसोबतची केमिस्ट्री यातून एक वेगळीच धमाल रंगणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहात एकत्र हसण्याचा आणि आनंद घेण्याचा अनुभव देता येईल. आपला आनंदाचा खेळ अजून जास्त मनोरंजक ढंगात अनुभवता येईल.’’

निर्मात्या फाल्गुनी पटेल म्हणतात की, ‘प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चित्रपट देणारे हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या ‘झिम्मा’ या लोकप्रिय चित्रपट मालिकेच्या तिसऱ्या भागाचा भाग होता येणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचा इरादा स्टुडिओज् हिरकणी या मराठी चित्रपटाच्या यशानंतर यावेळी एका नव्या संकल्पनेसह ‘झिम्मा ३’ मार्फत प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची वेगळी मेजवानी घेऊन येत आहे.’

यावेळी होणार कल्ला! 

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा ३’ची निर्मिती क्षिती जोग आणि फाल्गुनी पटेल यांनी केली आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत महिलांच्या सहलीतून रंगलेला ‘झिम्मा’चा प्रवास आता पुरुषांच्या या भन्नाट टोळीसोबत श्रीलंकेत पोहोचणार असून, या सहलीत नेमकी कोणती धमाल रंगते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झिम्मा ३ कधी प्रदर्शित होणार?

    Ans: १ जानेवारी, २०२७ रोजी झिम्मा ३ प्रदर्शित होणार

  • Que: काय आहे झिम्माचे वैशिष्ट्ये

    Ans: हलकीफुलकी कॉमेडी आणि उत्तम विषय हे पहिल्या दोन्ही चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे

  • Que: यावेळी झिम्मा ३ मध्ये काय आहे खास?

    Ans: यावेळी झिम्मा ३ मध्ये सर्व पुरुषांची सहल हेच खास वैशिष्ट्य आहे

Web Title: Jhimma 3 teaser released much awaited marathi film dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi movie
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी
1

‘मारी 2’नंतर धनुष-साई पल्लवीची जोडी पुन्हा एकत्र; ‘OM: Operation Mole’मध्ये IPS अधिकारी बनून साई पल्लवीची बाजी

Jai Shree Ram Marathi Movie: ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन
2

Jai Shree Ram Marathi Movie: ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या सेटवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन

Daryabhavani Movie Shooting in Konkan: शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा आता रुपेरी पडद्यावर! ‘दर्याभवानी’चे पूर्णगडावर चित्रीकरण
3

Daryabhavani Movie Shooting in Konkan: शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा आता रुपेरी पडद्यावर! ‘दर्याभवानी’चे पूर्णगडावर चित्रीकरण

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई
4

Aadi Anant Marathi Movie: हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही ‘आदि अनंत’ची बाजी; पहिल्याच आठवड्यात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.