Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The India Story : सिनेमातील मुख्य कलाकारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट! आयुक्तांनी सिनेमाचे केले कौतुक

प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या 'द इंडिया स्टोरी' या चित्रपटाची उत्सुकता वाढत असताना, कलाकार काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्माता सागर बी. शिंदे यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 22, 2026 | 09:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘द इंडिया स्टोरी’ या चित्रपटाची उत्सुकता वाढत असताना, चित्रपटातील प्रमुख कलाकार काजल अग्रवाल, श्रेयस तळपदे, दिग्दर्शक चेतन डीके आणि लेखक-निर्माते सागर बी. शिंदे यांनी महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली. सार्वजनिक आरोग्य आणि अन्नसुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर आधारित चित्रपटामुळे ही भेट विशेष चर्चेत आली आहे.

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचे ‘व्यसनखंडीनी’ रूप; व्यसनमुक्तीचा देणार शक्तिशाली संदेश

या भेटीदरम्यान तुकाराम मुंडे यांनी अन्नभेसळ आणि कीटकनाशकयुक्त शेतीसारख्या गंभीर विषयावर चित्रपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. त्यांनी सोशल मीडियावरही या चित्रपटाला शुभेच्छा देत समाजासाठी महत्त्वाच्या विषयावर भाष्य केल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. अभिनेत्री काजल अग्रवाल यांनीही मुंडे यांच्या प्रामाणिक आणि जनहितवादी कार्यपद्धतीबद्दल आदर व्यक्त केला.

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहयोगाने साकारलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, लेखन व निर्मिती सागर बी. शिंदे यांनी केली आहे. २४ जुलै २०२६ रोजी हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

Arijit Singh ने धर्मेंद्र प्रधानांना सुनावले? ‘स्वतःला देव समजतो…’ प्रोटेस्टला विरोध कारण्यांनाही दिले प्रत्युत्तर

‘द इंडिया स्टोरी’ मध्ये कीटकनाशकयुक्त शेती, अन्नभेसळ आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यासारख्या गंभीर विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. समाजात जागरूकता निर्माण करणे आणि या प्रश्नांवर व्यापक चर्चा घडवून आणणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक साईंदाणे, अनीता जाधव, विनायक साईंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तर छायांकन निशांत भागवत, संगीत मंगेश ढाकडे, संकलन आशीष म्हात्रे, गीतलेखन शकील आझमी आणि ध्वनी संकल्पना अनमोल भावे यांनी सांभाळली आहे. सार्वजनिक आरोग्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Web Title: Lead actors from the the india story movie met tukaram mundhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.