फोटो सौजन्य - Social Media
Arijit Singh ने त्याच्या अधिकृत X हॅन्डलवर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने नमूद केले होते की, “अरे, आता तर विद्यार्थ्यांनाही मारलं जात आहे. तुम्हाला याची लाज वाटत नाही का? अहो नेते, मंत्री… नेमकं चाललंय तरी काय? स्वतःला देव समजू लागलात का? प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जाईल. हर हर महादेव! लक्षात ठेवा… बदल हाच कायम असणारा नियम आहे.” Arijit Singh ला मोठ्या प्रमाणात तरुण ऐकतात, त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या मानसिकतेची आणि विचारधारेची मंडळी आहे. Arijit च्या एका चाहत्याला अरिजितचं विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे पटले नाही त्यामुळे त्याने थेट त्याला रिप्लाय केला आहे.
Arijit ने X वर “वाह! मी वर्दीच्या वेशात असणाऱ्या गुंड्याची व्हिडीओज पाहत आहे” अशी पोस्ट केली आहे. त्याखाली अरिजितवर नाराज असणाऱ्या एका चाहत्याने Arijit ला रिप्लाय देत म्हंटले आहे की, “हा विषय CJP किंवा सरकारचा नाही. पण मी तुमच्याबद्दल मनात बाळगलेला सगळा आदर आता संपला आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. पण तुम्हीच म्हणालात की, माझ्या मताला तुमच्यासाठी काहीच किंमत नाही. ठीक आहे, ते मी मान्य करतो. इतकी वर्षे तुमचा चाहता राहिलो, हीच कदाचित माझी चूक होती. पण आता मनापासून सांगतो, तुमच्याबद्दल मनात फक्त तीव्र नाराजी आणि तिरस्कार उरला आहे.”
The Legend Of Karna : कर्णाच्या जीवनावर आधारित ऍनिमेटेड सिरीज! कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार?
यावर Arijit Singh ने अतिशय सोप्या शब्दात उत्तर दिले आहे. Arijit Singh म्हणतो की, “माझा आदर कोण करतो किंवा नाही, याची मला चिंता नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत असण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचा मी आदर करतो. तुम्ही माझे चाहते आहात म्हणून मी तुम्हाला फक्त गोड बोलावं, अशी माझ्यावर कोणतीही सक्ती नाही. पण एक माणूस म्हणून मी तुमची मनापासून माफी मागतो. माझ्या शब्दांनी तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला खरोखरच वाईट वाटतं. माझा तसा हेतू नव्हता. त्या क्षणी मी फक्त रागात होतो. शक्य असेल तर मला माफ करा, म्हणजे माझ्या मनावरील ओझंही हलकं होईल. तुम्ही माझ्या सर्व प्लेलिस्ट हटवल्या किंवा माझं अस्तित्व विसरलात, तरी मला त्याचा राग नाही. तुम्ही आनंदी राहा, हीच माझी मनापासून इच्छा आणि प्रार्थना आहे. मात्र, यामुळे माझं मत बदलणार नाही. काळजी घ्या.”
बहुतेक तरुणांनी अरिजितच्या या मतांचं स्वागत करून त्याचे आभार मानले आहेत.






