Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान

Mamachya Govyala Jauya: विजू माने यांच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ची ११व्या दिवसाची कमाई किती? ७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या मराठी चित्रपटाने २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 09:14 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mamachya Govyala Jauya: मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विजू माने दिग्दर्शित या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाची दमदार कमाई सुरू आहे. रिलीजला अवघे ११ दिवस पूर्ण झाले असताना चित्रपटाने २०२६ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या टॉप १० यादीत स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे, या यादीत रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ पहिल्या क्रमांकावर आहे.

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये अंकुश चौधरी, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका आणि कॅमिओमध्येही झळकले आहेत. मनोरंजन, विनोद आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

११ दिवसांत किती कमाई?

विजू माने यांच्या या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने भारतात आतापर्यंत १.९३ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे, तर चित्रपटाची नेट कमाई १.७२ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८ लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ होत ती २३ लाखांवर पोहोचली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने तब्बल ४१ लाख रुपयांचा गल्ला जमवला. मात्र, चौथ्या दिवशी कमाईत मोठी घट झाली आणि कलेक्शन ११ लाख रुपयांवर आलं.

पाचव्या दिवशी चित्रपटाने १३ लाख रुपये कमावले, तर सहाव्या आणि सातव्या दिवशी प्रत्येकी सुमारे ९ लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर नवव्या आणि दहाव्या दिवशी पुन्हा कमाईत चांगली वाढ पाहायला मिळाली. या दोन दिवसांत चित्रपटाने मिळून सुमारे ४५ लाख रुपयांचा गल्ला जमवला.

७ कोटींचं बजेट, वसुलीसाठी आणखी किती कमाई आवश्यक?

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट सुमारे ७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाल्याचं कोईमोईच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. सध्याच्या कमाईनुसार चित्रपटाने आपल्या बजेटपैकी सुमारे २४.६ टक्के रक्कम वसूल केली आहे.

चित्रपटाला बजेटचा टप्पा गाठण्यासाठी अद्याप सुमारे ५.२७ कोटी रुपयांची कमाई करण्याची गरज आहे. त्यामुळे आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा वेग कायम राहतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारे मराठी सिनेमे

२०२६ मध्ये मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ हा १०५.६८ कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ ‘देऊळ बंद २’ने १०० कोटींच्या कमाईसह दुसरं स्थान मिळवलं आहे.

१. राजा शिवाजी – १०५.६८ कोटी रुपये
२. देऊळ बंद २ – १०० कोटी रुपये
३. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम – २७.८१ कोटी रुपये
४. तुम्बाडची मंजुला – १६.४७ कोटी रुपये
५. अगं अगं सूनबाई! काय म्हणता सासूबाई? – ८.९७ कोटी रुपये
६. घबाडकुंड – ७.४१ कोटी रुपये
७. सुपर डुपर – ३.४४ कोटी रुपये
८. भूतम भयम – २.९६ कोटी रुपये
९. मामाच्या गोव्याला जाऊया – १.९३ कोटी रुपये
१०. तिघी – १.६४ कोटी रुपये

अशाप्रकारे केवळ ११ दिवसांत ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ने २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या टॉप १०मध्ये प्रवेश केला आहे. आता चित्रपटाची कमाई आणखी किती वाढते आणि तो या यादीत किती वर पोहोचतो, याकडे मराठी चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे.

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Web Title: Mamachya govyala jauya box office collection day 11 total collection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • Ankush Choudhary
  • Box Office
  • santosh juvekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.